GT Drop Yash Dayal in PBKS Match : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16 मोसमातील 18 व्या सामन्यात गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) पंजाब किंग्सवर (Punjab Kings) सहा विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात गुजरात संघाने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात संघाने या सामन्यासाठी प्लेईंग 11 मध्ये बदल केल्याचं दिसून आलं. या सामन्यात गुजरात टायटन्स संघाने पंजाब विरुद्धच्या सामन्यात गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) याला संघात सामील केलं नाही.  गेल्या सामन्यात रिंकू सिंहने (Rinku Singh) यश दयालच्या षटकात सलग 5 षटकार ठोकले होते. त्यानंतर पंजाबविरुद्धच्या सामन्यात गुजरातच्या प्लेइंग 11 मध्ये त्याला स्थान मिळालं नाही. त्यामुळे चाहते संतापल्याचं दिसून आलं.


रिंकुनं ज्याच्या चेंडूवर 5 षटकार ठोकले, त्या यश दयालला गुजराने खेळवलंच नाही


कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या (Kolkata Knight Riders) शेवटच्या सामन्यात गुजरात टायटन्सला (Gujrat Titans) पराभवाचा सामना करावा लागला होता. या सामन्यात केकेआरच्या (KKR) रिंकू सिंहने यश दयालच्या षटकात सलग 5 षटकार ठोकून आपल्या संघाला अविश्वसनीय विजय मिळवून देण्याचं काम केलं. रिंकूने यश दयालच्या चेंडूंवर षटकार ठोकले होते, त्यामुळे अनेक चाहते यशचं सांत्वन करत त्याला प्रोत्साहन देताना दिसले. यश दयालचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी अनेक पोस्ट सोशल मीडियावर पाहायला मिळाल्या. मात्र, त्यानंतरच्या सामन्यात यशला संघात स्थान न दिल्याने चाहत्यांनी गुजरात संघावर नाराजी व्यक्त केली.






















मोहित शर्मा गुजरात संघात सामील


यश दयालच्या जागी गुजरात टायटन्स संघाने मध्यमगती गोलंदाज मोहित शर्माला संघात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय कर्णधार हार्दिक पांड्यानंही गुजरात संघात पुनरागमन केलं, तो आजारपणामुळे मागील सामन्यात खेळू शकला नव्हता.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023, Yash Dayal : रिंकू सिंहने ज्याला 5 षटकार ठोकले, त्या गोलंदाजाचं करिअरच धोक्यात? कोण आहे यश दयाल?