GT vs SRH Score Live IPL 2024: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्सचा 7 विकेट्सने विजय

GT vs SRH IPL 2024: हैदराबादने गुजरातला 163 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना गुजरातने 7 विकेट्स राखत हैदराबादचा पराभव केला. 

मुकेश चव्हाण Last Updated: 31 Mar 2024 06:55 PM
गुजरातचा 7 विकेट्सने विजय

हैदराबादने गुजरातला 163 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना गुजरातने 7 विकेट्स राखत हैदराबादचा पराभव केला.





साई सुदर्शन बाद

साई सुदर्शनला पॅट कमिन्सने झेलबाद केले. साई सुदर्शन 36 चेंडूत 45 धावा करून बाद झाला. त्याने 4 चौकार आणि एक षटकार मारला. आता गुजरातला जिंकण्यासाठी फक्त 25 धावांची आवश्यकता आहे.

गुजरातला जिंकण्यासाठी 30 चेंडूत 49 धावांची गरज

गुजरातला जिंकण्यासाठी 30 चेंडूत 49 धावांची गरज आहे. 

गुजरातने 13 षटकांत 2 विकेट्स गमावत केल्या 98 धावा

गुजरातने 13 षटकांत 2 विकेट्स गमावत 98 धावा केल्या आहेत. साई सुदर्शन आणि डेव्हिड मिलर सध्या फलंदाजी करत आहे.

गुजरातला दुसरा धक्का, शुभमन गिल बाद

गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला. शुभमन गिल ३६ धावा करून बाद झाला. त्याने 28 चेंडूंचा सामना करत 36 धावा केल्या. यादरम्यान त्याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. गिलला मार्कंडेयने बाद केले.

गुजरात टायटन्सच्या 9 षटकांत 1 गडी गमावून 74 धावा

गुजरात टायटन्सने 9 षटकांत 1 गडी गमावून 74 धावा केल्या. शुभमन गिल 36 धावा करून खेळत आहे. 27 चेंडूंचा सामना करताना त्याने 2 चौकार आणि 1 षटकार लगावला. साई सुदर्शन 13 धावा करून खेळत आहे. 

जरातला विजयासाठी अद्याप 111 धावांची गरज

गुजरात टायटन्सची धावसंख्या 50 धावांच्या पुढे गेली. संघाने 6 षटकांत 1 गडी गमावून 52 धावा केल्या. शुभमन गिल 18 धावा करून खेळत आहे. साई सुदर्शन 9 धावा करून खेळत आहे. त्याने चौकार मारला आहे. गुजरातला विजयासाठी अद्याप 111 धावांची गरज आहे.

गुजरातला पहिला धक्का

गुजरातला पहिला धक्का बसला आहे. ऋद्धिमान साहाला पॅट कमिन्स झेलबाद केले. साहाने 13 चेंडूत 25 धावा केल्या.

ऋद्धिमान साहा आणि शुभमन गिल सलामीला

गुजरात टायटन्सचा डाव सुरू झाला आहे. ऋद्धिमान साहा आणि शुभमन गिल सलामीला फलंदाजीसाठी आले आहेत.

गुजरातला जिंकण्यासाठी 163 धावांचं आव्हान

हैदराबाद संघाने गुजरातला जिंकण्यासाठी 163 धावांचं आव्हान दिलं आहे. 





वॉशिंग्टन सुंदर बाद

हैदराबादला सातवा धक्का बसला आहे. वॉशिंग्टन सुंदर बाद झाला आहे. 

हैदराबादची सहावी विकेट

हैदराबादची सहावी विकेट गेली आहे. मोहित शर्माने शाहबाज अहमदला झेलबाद केले. सध्या हैदराबादची धावसंख्या 159 वर पोहचली आहे.

हैदराबादच्या 5 विकेट गमावून 137 धावा

हैदराबादने 5 विकेट गमावून 137 धावा केल्या आहेत. अब्दुल समद 15 धावा करून खेळत आहे. शाहबाज 13 धावा करून खेळत आहे.

हैदराबादला पाचवा धक्का, मार्कराम बाद

सनरायझर्स हैदराबाद बॅकफूटवर आहे. संघाने पाचवी विकेट गमावली. उमेश यादवने मार्करामला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 19 चेंडूत 17 धावा करून तो बाद झाला. हैदराबादने 5 विकेट गमावून 118 धावा केल्या आहेत. आता अब्दुल समद आणि शाहबाज अहमद फलंदाजी करत आहेत.

अभिषेक शर्मा बाद

हैदराबाद संघाचे तीन गडी बाद झाले आहेत. अभिषेक शर्माला मोहित शर्माने झेलबाद केले. अभिषेक शर्माने 20 चेंडूत 29 धावा केल्या.





हैदराबादला दुसरा धक्का; ट्रॅव्हिस हेड बाद

हैदराबादला दुसरा धक्का बसला आहे. मयंक अग्रवालनंतर आता ट्रॅव्हिस हेड देखील बाद झाला आहे. 





दराबादच्या 5 षटकांत 1 गडी गमावून 41 धावा

सनरायझर्स हैदराबादने 5 षटकांत 1 गडी गमावून 41 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेड 16 धावा करून खेळत आहे. त्याने 9 चेंडूत 3 चौकार मारले आहेत. अभिषेक शर्मा 4 चेंडूत 6 धावा करून खेळत आहे. 

हैदराबादला पहिला धक्का, मयंक अग्रवाल बाद

सनरायझर्स हैदराबादला पहिला धक्का बसला. मयंक अग्रवाल 17 चेंडूत 16 धावा करून बाद झाला. उमरझाईने त्याला झेलबाद केले.

हेड-मयंक यांच्यात चांगली भागीदारी

ट्रॅव्हिस हेडसह मयंकही चांगली फलंदाजी करत आहे. त्याने 10 चेंडूत 11 धावा केल्या आहेत. हैदराबादने 3 षटकांनंतर बिनबाद 27 धावा केल्या. 

हैदराबादच्या 2 षटकांत 20 धावा

गुजरातकडून उमेश यादवने दुसरे षटक टाकले. हैदराबादने 2 षटकांनंतर बिनबाद 20 धावा केल्या आहेत. हेड 14 तर मयंक 6 धावा करत खेळत आहे. मयंकने ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर 3 धावा घेतल्या होत्या. यानंतर हेडने चौकार मारला.

हैदराबाद अन् गुजरातची पाहा Playing XI

GT vs SRH Score Live IPL 2024 : नाणेफेक जिंकून हैदराबादचा फलंदाजीचा निर्णय

SRH won Toss Score Live IPL 2024 : नाणेफेक जिंकून हैदराबाद सनरायझर्सने फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. 3.30 वाजता सामन्याला सुरुवात होईल.

हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा घेतला निर्णय

हैदराबादने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.





सनरायझर्स हैदराबादची संभाव्य Playing XI:

ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट, उमरान मलिक

गुजरात टायटन्सची संभाव्य Playing XI:

रिद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल (कर्णधार), विजय शंकर, अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन, साई सुधरसन

सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ:

ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (w), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (c), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव, राहुल त्रिपाठी, टी नटराजन, वानिंदू हसरंगा, अनमोलप्रीत सिंग, सुब्रमण्यन, सनवीर सिंग, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंग

गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ:

रिद्धिमान साहा (w), शुभमन गिल (c), अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, उमेश यादव, मोहित शर्मा, स्पेन्सर जॉन्सन, साई सुदर्शन, शरथ बीआर, अभिनव मनोहर, नूर अहमद, मानव सुथार, केन विल्यमसन, जयंत यादव, संदीप वॉरियर, शाहरुख खान, जोशुआ लिटल, दर्शन नळकांडे, कार्तिक त्यागी, सुशांत मिश्रा, मॅथ्यू वेड

पार्श्वभूमी

GT vs SRH Score Live IPL 2024: आयपीएल 2024 च्या हंगामात आज गुजरात (GT) अन् हैदराबाद (SRH) यांच्यात झालेल्या सामन्यात गुजरातने बाजी मारली आहे. हैदराबादने गुजरातला 163 धावांचं आव्हान दिलं होतं. या धावांचा पाठलाग करताना गुजरातने 7 विकेट्स राखत हैदराबादचा पराभव केला. 


 




- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.