GT Vs RCB, IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 43 व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore) ऐकमेकांशी भिडणार आहे. या सामन्यात बंगळुरूच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या हंगामात दोन्ही संघानं चांगली कामगिरी करून दाखवली आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत गुजरातचा संघ अव्वल स्थानी आहे. तर, बंगळुरूचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. गुजरातनं आठ पैकी सात सामने जिंकले आहेत. तर, एक सामना गमावला आहे. दुसरीकडं बंगळुरूच्या संघाला नऊ पैकी सहा सामन्यात विजय मिळवता आला आहे. आजच्या सामन्यात कोणता संघ बाजी मारतो? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. 


फॅफ डू प्लेसिस नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुसमोर शनिवारी ‘आयपीएल’मध्ये गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरात टायटन्सचं आव्हान असणार आहे. मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणारा हा सामना जिंकून प्लेऑफमध्ये स्थान निश्चित करण्याचे गुजरातचे लक्ष्य असेल.


कधी, कुठे पाहणार सामना?
गुजरात टायटन्स आणि आरसीबी यांच्यातील सामना मुंबईतील ब्रेबॉन स्टेडिअममध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा सामना दुपारी 3. 30 वाजता सुरू होईल. दुपारी 3 वाजता नाणेपेक होईल.वेगवेगळ्या भाषेतून सामना पाहता येणार आहे. तसेच हॉटस्टार अॅपवरही सामना पाहता येईल. याशिवाय https://marathi.abplive.com/ येथेही तुम्हाला आयपीएलचे लाईव्ह कव्हरेज पाहाता येईल.


संघ-


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग इलेव्हन: 
फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकिपर), शाहबाज अहमद, महिपाल लोमरोर, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, जोश हेझलवूड.


गुजरात टायटन्स प्लेइंग इलेव्हन: 
शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेट किपर) हार्दिक पांड्या (कर्णधार), साई सुधारसन, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, प्रदीप संगवान, अल्झारी जोसेफ, लॉकी फर्ग्युसन, मोहम्मद शमी.


हे देखील वाचा