GT vs PBKS IPL 2024: शशांक सिंगकडून मोहीम फत्ते, पंजाबचा दुसरा विजय, गुजरातला पराभवाचा धक्का
GT vs PBKS IPL 2024: गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर हा सामना रंगणार आहे.
गुजरात टायटन्सनं दिलेलं 199 धावांचं आव्हानं पंजाब किंग्जनं पूर्ण केलं आहे. शशांक सिंग, आशुतोष शर्मा यांच्या फलंदाजीच्या जोरावर पंजाबनं तीन विकेटनं विजय मिळवला.
पंजाबच्या शशांक सिंग डाव सावरत अर्धशतक पूर्ण केलं आहे.
पंजाबला सहावा धक्का बसला आहे. जितेश शर्मा 16 धावा करुन बाद झाला आहे. पंजाबला विजयासाठी आता 50 धावांची गरज आहे.
पंजाब किंग्जनं 12 व्या ओव्हरमध्ये 100 धावांचा टप्पा पार केला आहे. शशांक आणि सिकंदर रजानं पंजाबचा डाव सावरला.
पंजाबनं 200 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 10 ओव्हरमध्ये 83 धावा केल्या आहेत. पंजाबनं चार विकेट गमावून 83 धावा केल्या.
पंजाबला तिसरा धक्का बसला आहे. प्रभासिमरन 35 धावा करुन बाद झालाय.
पंजाबला दुसरा धक्का बसला असून बेयरस्टो 22 धावा करुन बाद झाला आहे.
शुभमन गिलनं एकहाती किल्ला लढवत 89 धावा केल्या. तर, अखेरच्या ओव्हर्समध्ये तेवतियाची फटकेबाजी केली. गुजरातनं पंजाबपुढं विजयासाठी 200 धावांचं आव्हान ठेवलं आहे.
गुजरातला चौथा धक्का बसला आहे. विजय शंकर 8 धावा करुन बाद झाला आहे.
गुजरातच्या डावाला साई सुदर्शन आणि शुभमन गिलनं सावरलं. साई सुदर्शन 33 धावा करुन बाद झाला. 14 व्या ओव्हरपर्यंत गुजरातच्या 122 धावा झाल्या आहेत.
गुजरातला दुसरा धक्का बसला असून ब्रारनं विलियमन्सनला 26 धावांवर बाद केलं.
पहिल्या सहा ओव्हरमध्ये गुजरातच्या 1 बाद 52 धावा झाल्या आहेत. पंजाबच्या गोलंदाजांनी गुजरातला मोठे फटके मारण्यापासून रोखलं.
गुजरात टायटन्सला पहिला धक्का बसला आहे. पंजाब किंग्जच्या रबाडानं साहाला 11 धावांवर बाद केलं.
गुजरातनं सावध सुरुवात केली असून दोन ओव्हरनंतर बिनबाद 19 धावा केल्या आहेत. शुभमन गिल आणि साहा मैदानावर आहेत.
पंजाब किंग्जनं टॉस जिंकला असून शिखर धवननं पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
पंजाब आणि गुजरात यांच्यात थोड्याच वेळात टॉस होणार आहे.
एकेकाळी पंजाबकडून खेळणाऱ्या मोहित शर्मा विरुद्ध पंजाबला खबरदारी घ्यावी लागणार आहे. डेथ ओव्हर्समध्ये मोहितची गोलंदाजी फलंदाजांचं टेन्शन वाढवू शकते.
आयपीएलमध्ये आज गुजरात टायटन्स आण पंजाब किंग्ज यांच्यात आयपीएलची 17 वी मॅच होणार आहे. गुजरातनं यापूर्वी दोन मॅच जिंकल्यात तर पंजाबनं एका मॅचमध्ये विजय मिळवलाय.
गुजरातविरुद्धच्या सामन्याआधी पंजाब किंग्सला धक्का बसला आहे. लियाम लिव्हिंगस्टोनला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे.
शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, शशांक सिंग, हर्षल पटेल, हरपीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर
शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (विकेटकीपर), साई सुधारसन, अजमतुल्ला ओमरझाई, डेव्हिड मिलर, विजय शंकर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा
गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील रोमांचक सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाईल. या मैदानावर सहसा फलंदाजांचे एकतर्फी वर्चस्व असते. मात्र, गेल्या सामन्यात खेळपट्टी थोडी संथ होती. त्यामुळे फलंदाजांना शॉट्स मारण्यात अडचणी येत होत्या. या मोसमात झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये एकाही संघाला 170 चा आकडा गाठता आला नाही.
पार्श्वभूमी
GT vs PBKS IPL 2024: आज गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरुद्ध पंजाब किंग्सचा (Punjab Kings) सामना होणार आहे. गुजरातमधील नरेंद्र मोदी मैदानावर हा सामना रंगणार आहे. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता हा सामना सुरु होईल.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -