Kumar Kartikeya Singh: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळवण्यासाठी आयपीएल युवा खेळाडूंसाठी चांगला प्लॅटफॉर्म ठरला आहे. आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये फ्रंचायझींनी अनेक युवा खेळाडूंवर बोली लावली. त्यातील अनेक खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ज्यात आयुष बदोनी, तिलक वर्मा आणि जितेश शर्मा यांसारख्या खेळाडूचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सचा फिरकीपटू कुमार कार्तिकेय सिंहनंही (Kumar Kartikeya Singh) या यादीत स्थान मिळवलं आहे. आयपीएल 2022 चा अर्धा हंगाम पार पडल्यानंतर मुंबईच्या संघात सामील झालेल्या कुमार कार्तिकेय सिंहनं चर्चेचा विषय ठरला आहे. आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात कार्तिकेयेनं जशी चमकदार कामगिरी केली. तितकेच त्याचा क्रिकेटर होण्याचा प्रवासही संघर्षांनी भरलेला आहे.


कार्तिकेयला वडिलांचा पाठिंबा
छोट्या शहरातून बाहेर पडून क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक मुलाच्या आयुष्यात गरिबी, संघर्ष आणि संकटं येतात.  कार्तिकेयचेच्या आयुष्यही अशाच संघर्षानं भरलेलं आहे. कार्तिकेयचे वडील यूपी पोलिसात हवलदार म्हणून कार्यरत होते. त्यामुळं क्रिकेट कोचिंगचा महागडा खर्च उचलण्याइतकी कमाई त्यांना नव्हती. मात्र, तरिही कार्तिकेयला क्रिकेटर बनवण्यासाठी त्यांनी पाऊल मागं घेतलं नाही.


कार्तिकेया संघर्षमय प्रवास
दिल्लीत कार्तिकेयला फक्त एकच मित्र राधेश्याम माहीत होता, जो क्रिकेट खेळायचा. तो कार्तिकेयला अनेक क्लबमध्ये घेऊन गेला. जेणेकरून त्याला डीडीसीएच्या लीगमध्ये खेळण्याची संधी मिळेल. पण प्रत्येक क्लबनं त्याला भरमसाठ फी मागितली. यानंतर, कार्तिकेय संजय भारद्वाज यांच्याकडे पोहोचला आणि त्याच्या आर्थिक परिस्थितीबद्दल सर्व काही स्पष्टपणे सांगितलं. त्यानंतर त्यानं कार्तिकेयला नेटमध्ये चेंडू टाकण्याची संधी दिली. अवघ्या एका चेंडूनंतर संजयनं त्याला प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कार्तिकेयनं अकादमीपासून 80 किमी अंतरावर गाझियाबादला लागून असलेल्या मसुरी गावात एका कारखान्यात काम करायला सुरुवात केली. राहण्यासाठी एक खोलीही होती. तो रात्रभर कारखान्यात काम करायचा आणि सकाळी पहाटे अकादमीत पोहोचायचा. फक्त 10 रुपये वाचवण्यासाठी आणि त्या पैशानं बिस्किटांचे पॅकेट विकत घेण्यासाठी तो अनेक मैल चालायचा.जेव्हा प्रशिक्षक भारद्वाज यांना संपूर्ण घटना कळली तेव्हा त्यांनी अकादमीच्या स्वयंपाकीसोबत कार्तिकेयच्या राहण्याची व्यवस्था केली.


देशांतर्गत क्रिकेटमध्ये कार्तिकेयची कामगिरी
कार्तिकेय सिंह 28 एप्रिलला मुंबई इंडियन्सच्या संघात सामील झाला. डावखुरा फास्ट बॉलर मोहम्मद अर्शद खान याला दुखापत झाल्यामुळं कार्तिकेय बदली खेळाडू म्हणून संघात स्थान देण्यात आलं.  मुंबईनं कार्तिकेयला त्याच्या मूळ किंमतीत 20 लाख रुपयांच्या  बेस प्राईजवर विकत घेतलं. कुमारनं 2018 साली स्थानिक क्रिकेटमध्ये मध्य प्रदेशमधून पदार्पण केलं. आतापर्यंत त्यानं 9 प्रथम श्रेणी, 9 लिस्ट ए आणि 8 टी-20 मॅच खेळल्या आहेत. प्रथम श्रेणीमध्ये त्याला 35, लिस्ट एमध्ये 18 आणि टी-20 क्रिकेटमध्ये 9 विकेट मिळाल्या आहेत.


हे देखील वाचा-