GT vs LSG, IPL 2023 : पांड्या बदर्समध्ये अहमदाबादमध्ये रंगतदार लढत सुरु आहे. 228 धावांचा पाठलाग करताना लखनौने दमदार सुरुवात केली. पण फिल्डिंगदरम्यान एक अजब दृश्य पाहायला मिळाले..गुजरातचा विकेटकिपर वृद्धीमान साहा फिल्डिंगला उलटी पॅंट घालून आल्याचे दिसले. विकेटकिपिंग करण्यासाठी आलेला साहा पँट उलटी घातल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झालाय. नेटकरी याबाबत चर्चा करत आहेत. 


फिल्डिंग करताना साहा दोन षटकानंतर तंबूत परतला. त्याच्या जागी केएस भरतने विकेटकिपिंगची जबाबदारी सांभाळली. लखनौची फलंदाजी सुरु झाली त्यावेळीच भरत विकेटकिपिंगसाठी आला होता. पण पंचांनी यावर आक्षेप घेतला. त्यामुळे साहाला विकेटकिपिंगसाठी मैदानात यावे लागले. गडबडीत तयार होऊन येताना साहा याने उलटी पँट घातल्याचे समोर आलेय. सोशल मीडियावर साहाचा व्हिडीओ व्हायरल झालाय.  


 














जो फोटो व्हायरल होताना दिसतोय त्यात साहानं उलटी पँट घातल्याचे स्पष्ट दिसत आहे. या सामन्यातील पहिल्या काही षटकात तो असाच विकेटमागे उभा होता. त्यानंतर काही वेळानंतर त्याने ही चूक सुधारल्याचे दिसले. विकेट किपिंग करताना दिसला त्यावेळी त्याने योग्य प्रकारे पँट घातल्याचे पाहायला मिळत होते.  


साहाचे वादळ - 


वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल या जोडीने गुजरातला वादळी सुरुवात करुन दिली. खासकरुन साहा ने लखनौच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. साहाने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी केली. शुभमन गिल याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली.. साहा फटकेबाजी करत असताना गिलने चांगली साथ दिली. साहा आणि गिल जोडीने १२ षटकात १४२ धावांची सलामी दिली. साहाने मौदानाच्या चारी बाजूने फटकेबाजी केली. साहा याने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक झळकावले होते. गुजरातने पावरप्लेमध्ये ७८ धावांचा पाऊस पाडला होता. साहाने ४३ चेंडूत वादळी ८१ धावांची खेळी केली. या खेळीत साहाने चार षटकार आणि दहा चौकार लगावले. साहा आणि गिल यांनी लखनौच्य प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला.