GT vs KKR Bad Weather : अहदमबादमध्ये सध्या वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना स्थगित कऱण्यात आला आहे. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर सामना सुर होण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये कोलकाता आणि गुजरात यांच्यामध्ये लढत होत आहे. कोलकाताने याआधीच प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. गुजरातला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आजचा सामना जिंकावाच लागणार आहे. सामना पावसामुळे रद्द करण्यात आला तर कोलकात्याचं यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात येणार आहे.
गुजरातमध्ये दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. सामना सुरु होण्याआधी सकाळीही पावसाने हजेरी लावली होती. दुपारी पावसाने विश्रांती घेतली.. पण सायंकाळी पुन्हा एकदा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खेळपट्टी कव्हर्सनी झाकण्यात आली. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पंच मैदानाची पाहणी करतील, अन् सामन्याबाबतचा निर्णय घेतली.
अहमदाबादमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे अद्याप नाणेफेक झालेली नाही. मैदान कव्हर्सनी झाकण्यात आले आहे. सामना उशीराने सुरुवात होणार असल्याचं आयपीएलच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरुन सांगण्यात आले आहे. 7.10 मिनिटांनी मैदानावरील कव्हर्स काढण्यात येणार होते. पण त्याचवेळी पावसाने हजेरी लावली. जोरदार वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळत होता. त्यामुळे कव्हर्स पुन्हा खेळपट्टीवरच ठेवण्यात आले.
तर पाच पाच षटकांचा सामना -
8.30 पासून आता षटकांची संख्या कमी होईल. जसा जसा वेळ पुढे जाईल तसतसं षटकांची संख्या कमी करण्यात येणार आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतल्याचं समोर आले आहे. पण खेळपट्टी आणि मैदान सुकवण्यासाठी ग्राऊंड स्टाफला मेहनत घ्यावी लागणार आहे. सायंकाळी 10.56 पर्यंत मैदान खेळण्यासाठी सज्ज झालं तर पाच पाच षटकांचा सामना होईल.
गेल्यावर्षीच्या उपविजेत्या गुजरातचा प्लेऑफ प्रवेशासाठी संघर्ष
गुजरात टायटन्सनं 2022 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवल्यानंतर गेल्या वर्षी त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं. गुणतालिकेत ते आठव्या स्थानावर असून प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत.