GT vs CSK IPL 2023 Ruturaj Gaikwad : आयपीएलच्या 16 व्या हंगामातील पहिल्याच सामन्यात मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड याने धावांचा पाऊस पाडला. अवघ्या आठ धावांमुळे ऋतुराज गायकवाडचे शतक हुकले. अल्जारी जोसेफ याने ऋतुराज गायकवाड याला 92 धावांवर बाद केले. ऋतुराज गायकवाड याने 50 चेंडूत 92 धावांच खेळी केली. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूने ऋतुराज गायकवाड याने चौकार षटकारांचा पाऊस पाडला. ऋतुराज गायकवाडपुढे गुजरातचा प्रत्येक गोलंदाजाने गुडघे टेकले होते. ऋतुराज गायकवाडने चोहोबाजूने धावा चोपल्या. ऋतुराज गायकवाडने 9 षटकार आणि 4 चौकारांचा पाऊस पाडला. ऋतुराज गायकवाड 18 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर अल्जारी जोसेफच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याआधी ऋतुराज गायकवाड याने तीन विक्रम केलेय.
ऋतुराज गायकवाडचे विक्रम -
आयपीएल 2023 चे पहिले अर्धशतक
आयपीएल 2023 चा पहिला षटकार
आयपीएल 2023 चा पहिला चौकार
टीम इंडियात सलामी फलंदाजाच्या शर्यतीत असणारा ऋतुराज गायकवाड याने पहिल्याच सामन्यात विस्फोटक फलंदाजी केली. देशांतर्गत क्रिकेटमध्येही ऋतुराज गायकवाड याने धावांचा पाऊश पाडलाय. आज झालेल्या सामन्यात ऋतुराज गायकवाड याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. ऋतुराज गायकवाड याने अवघ्या 23 चेंडूत अर्धशतक झळकावले. ज्या मैदानावर चेन्नईच्या इतर फलंदाजाल चाचपडत होते, तिथे ऋतुराज गायकवाड चौकार षटकारांचा पाऊस पाडत होता. ऋतुराज गायकवाडचा शतक अवघ्या आठ धावांनी हुकले. अल्जारी जोसेफच्या एका फुल टॉस चेंडूवर ऋतुराज गायकवाड बाद झाला.
चेन्नईची 178 धावांपर्यंत मजल -
ऋतुराज गायकवाड याच्या खेळीच्या बळावर चेन्नईने सन्मानजनक धावसंख्या उभारली. चेन्नईने निर्धारित 20 षटकात सात विकेटच्या मोबद्लायत 178 धावा केल्या. ऋतुराज गायकवाड याने 92 धावांची खेळी केली. तर धोनीने अखेरच्या षटकात चौकार आणि षटकार लगावले. धोनीने 7 चेंडूत 14 धावांचे योगदान दिलेय. गुजरातकडून मोहम्मद शामी, राशिद खान आणि अल्जारी जोसेफ यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. गुजरातला विजयासाठी 20 षटकात 179 धावांची गरज आहे.