Shami 100th IPL Wicket : गुजरातचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामी याने चेन्नईचा सलामी फलंदाज डेवन कॉनवे याला बाद करत खास विक्रम केला आहे. शामीचा चेंडू कॉनवेला समजला नाही. या विकेटसह शामीने आयपीएलमध्ये 100 विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. कॉनवेला बाद केलेला शामीचा चेंडूने अनेकांचे लक्ष वेधले, हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या काही षटकात गुजरातने चेन्नईच्या फलंदाजांना धावा काढू दिल्या नाहीत. दोन षटकात फक्त दोन धावा करता आल्या होत्या. परिणामी कॉनवे मोठा फटका मारायला गेला अन् बाद झाला. शामीने कॉनवेला टाकलेला चेंडू अप्रितिम होता. शामीने कॉनवेला बाद करत आयपीएलमध्ये 100 विकेट घेण्याचा पराक्रम केला. मोहम्मद शामीने आयपीएमलमधील पहिली विकेट क्लिन बोल्डच्या स्वरुपात घेतली होती. तर 50 वी आणि 100 विकेटही त्याने अशीच घेतली.
पाहा व्हिडीओ
अरजित सिंह याने आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले. तर रश्मिका मंधाना आणि तमन्ना भाटिया यांच्या डान्सवर उपस्थित प्रेक्षक थिरकले. कलाकारांच्या दमदार परफॉर्मनंतर आयपीएलच्या 16 व्या हंगामाला सुरुवात झाली. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धोनीचा चेन्नई संघ प्रथम फलंदाजी करत आहे.
चेन्नईची प्लेईंग 11
डेवेन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, मोईन अली, बेन स्टोक्स, रविंद्र जाडेजा, शिवम दुबे, अंबाती रायडू, एम एस धोनी (कर्णधार/विकेटकिपर), मिचेल सँटनर, दीपक चाहर, राजवर्धन हंगारकेरकर
गुजरातची प्लेईंग 11 -
पांड्याची ग्रँड एन्ट्री -
गतविजेता गुजरात आणि चेन्नई यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. हार्दिक पांड्या आणि एमएस धोनी पहिल्या विजयासाठी मैदानात उतरणार आहेत. ओपनिंग सरेमनीमधील परफॉर्मन्स झाल्यानंतर स्टेजवर बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव जय शाह आणि आयपीएल चेअरमन अरुण सिंह धूमाल आले होते. त्याशिवाय चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी आणि गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या यांनाही स्टेजवर आमंत्रित कऱण्यात आले. हार्दिक पांड्याची ग्रँड एन्ट्री झाली. पांड्या छोट्या कारमधून स्टेजवर आला होता. त्यावेळी त्याच्या हातात आयपीएलची ट्रॉफी होती.