Golden DUCK for Rachin Ravindra : लखनौविरोधात प्रथम फलंदाजी कऱणाऱ्या चेन्नईची (CSK) सुरुवात अतिशय खराब झाली. दुसऱ्याच षटकात चेन्नईला पहिला धक्का बसला. सलामी फलंदाज रचिन रवींद्र (Rachin Ravindra) गोल्डन डक झाला. लखनौचा वेगवान गोलंदाज मोहसीन खान (Mohsin Khan) याचा अप्रतिम चेंडू रचिनला समजलाच नाही. रचिन रवींद्रचा त्रिफाळा उडाला. चेन्नईने अवघ्या चार धावांवर पहिली विकेट गमावली. सध्या अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाड हे मराठमोळे खेळाडू मैदानात आहेत.
इकाना स्टेडियमवर केएल राहुल यानं नाणेफेकीचा कौल जिंकला. राहुलनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईकडून अजिंक्य रहाणे आणि रचिन रवींद्र यांनी डावाची सुरुवात केली. तर लखनौकडून मॅट हेनरी यानं पहिलं षटक फेकलं. मॅट हेनरी याचं पहिलं षटक अजिंक्य रहाणं यानं खेळून काढलं. यामध्ये त्यानं चार धावा काढल्या. लखनौकडून मोहीसन खान दुसरं षटक घेऊन आला. पहिल्याच चेंडूवर त्यानं रचिन रवींद्र याला तंबूचा रस्ता दाखवला. रचिन रवींद्र याला मोहसीनचा चेंडू समजलाच नाही. रचिन रवींद्र गोल्डन डकचा शिकार झाला. मोहसीन खान यानं लखनौला शानदार सुरुवात दिली.
ऋतुराजही बाद -
अवघ्या चार धावांवर रचिन बाद झाल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड मैदानावर आला. अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाड यांनी चेन्नईचा डाव सावरण्यास सुरुवात केली. दोघांनी वेगवान धावाही काढल्या. पण यश ठाकूर यानं ऋतुराज याला केएल राहुल याच्याकरवी झेलबाद केले. 33 धावांवर चेन्नईला दुसरा धक्का बसलाय. ऋतुराज गायकवाड यानं 13 चेंडूमध्ये एका चौकाराच्या मदतीने 17 धावांचं योगदान दिलं. अजिंक्य रहाणे 16 धावांवर खेळत आहे. रवींद्र जाडेजाला बढती मिळाली आहे. चेन्नईचा संघ कितीपर्यंत मजल मारतोय? याकडे चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
दोन्ही संघाची प्लेईंग 11 कशी आहे...
LSG vs CSK Live Score : चेन्नई सुपर किंग्सच्या ताफ्यात कोण कोण ?
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोइन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चाहर, तुषार देशपांडे, मुस्तफिजुर रहमान, मथीशा पथिराना
LSG vs CSK Live Score: लखनौचे 11 शिलेदार कोणते ?
क्विंटन डी कॉक, केएल राहुल (विकेटकीपर/कर्णधार), दीपक हुड्डा, मार्कस स्टोइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, क्रुणाल पांड्या, मैट हेनरी, रवि बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकुर