Mumbai Indians Vs Sunrisers Hyderabad 2024: तब्बल 38 षटकार आणि 31 चौकारांचा पाऊस पडलेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने आपला यंदाचा पहिला विजय मिळवताना मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला. हैदराबादने आयपीएलमधील सर्वोत्तम धावसंख्येचा विक्रम रचताना 20 षटकांत 3 बाद 277 धावा केल्या. यानंतर त्यांनी मुंबईला 20 षटकांत 5 बाद 246 धावांवर रोखले. हैदराबादकडून स्फोटक अर्धशतक झळकावलेला अभिषेक शर्मा सामनावीर ठरला.
आयपीएल 2024 चं हंगाम सुरु होण्याआधी मुंबई इंडियन्सने मोठा निर्णय घेतला. मुंबईच्या टीम मॅनेजमेंटनं गुजरात टायटन्सच्या संघातून हार्दिक पांड्याला आपल्या संघात परत घेतलं. हार्दिक पांड्याला संघात घेताना त्याला मुंबईचं कर्णधारपद देण्यात आलं. मुंबईचं कर्णधारपद 2013 ते 2023 पर्यंत रोहित शर्माकडे होते. रोहित शर्माला कर्णधारपदावरुन हटवल्यानंतर रोहित शर्माचे चाहते नाराज असल्याचे पाहायला मिळाले. मुंबईच्या गेल्या दोन सामन्यातही हे दिसून आले.
मुंबईचा पहिला सामना नरेंद्र मोदी मैदानावर गुजरातविरुद्ध झाला. यावेळी रोहित शर्माच्या चाहत्यांनी मैदान गाजवत हार्दिक पांड्याला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दुसरा सामना हैदराबाद येथे सनरायझर्स हैदराबादविरुद्ध झाला. एस.मानसिंग मैदानावर देखील उपस्थित चाहत्यांनी 'मुंबईचा राजा रोहित शर्मा' अशा घोषणा दिल्या. याचदरम्यान मुंबईच्या संघातून एक मोठी माहिती समोर येत आहे. मुंबईच्या संघात दोन गट पडल्याचे सांगण्यात येत आहे. एक गटात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा आणि इतर खेळाडूंचा समावेश असून दुसऱ्या गटात हार्दिक पांड्या आणि इशान किशन आणि इतर खेळाडूंचा समावेश असल्याची चर्चा रंगली आहे. अद्याप अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नसली तर मुंबई इंडियन्सच्या संघात दोन गट पडल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.
रोहित शर्मा आणि आकाश अंबानी यांची भेट
मुंबई इंडियन्सनच्या गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्या विरोधातील पराभवानंतर संघाचे मालक असलेल्या अंबानी परिवारातील आकाश अंबानी यांनी रोहित शर्माची भेट घेतली आहे. रोहित शर्मा आणि आकाश अंबानी यांच्यात राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर चर्चा सुरु असल्याचं पाहायला मिळालं.
संबंधित बातम्या:
Kavya Maran: हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video