Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians 2024: मुंबई इंडियन्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध (MI Vs SRH) पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याचदरम्यान आता भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने हार्दिक पांड्यावर निशाणा साधला आहे. 


हार्दिक पांड्याच्या खेळीवर इरफान पठाणने टीका केली आहे. इरफान पठाण एक्स (आधीचे ट्विटर)वर पोस्ट करत म्हणाला की, जर संघाचे सर्व फलंदाज 200 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत असतील तर कर्णधार 120 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करू शकत नाही. या पोस्टमध्ये इरफान पठाणने हार्दिकचं नाव घेणं टाळलं आहे. मात्र, इरफान पठाणचे ट्विट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.






हार्दिक पांड्याने 20 चेंडूत 24 धावा केल्या-


मुंबई इंडियन्ससमोर 278 धावांचे लक्ष्य होते. सलामीवीर रोहित शर्मा आणि इशान किशन यांनी झंझावाती सुरुवात केली. यानंतर, तिलक वर्मा आणि टीम डेव्हिडसह उर्वरित फलंदाजांनी सुमारे 200 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या, परंतु मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने 20 चेंडूत 24 धावा केल्या.


इशान किशनच्या 261.54 स्ट्राईक रेटने धावा-


हार्दिक पांड्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर इशान किशनने 13 चेंडूत 261.54 च्या स्ट्राईक रेटने 34 धावा केल्या. रोहित शर्माने 12 चेंडूत 216.67 च्या स्ट्राईक रेटने 26 धावांचे योगदान दिले. नमन धीरने 14 चेंडूत 214.29 च्या स्ट्राईक रेटने 30 धावा केल्या. त्याचवेळी, टिळक वर्माने 34 चेंडूत 64 धावांची उत्कृष्ट खेळी केली. तर टीम डेव्हिडने शेवटच्या षटकांमध्ये 22 चेंडूत 42 धावा केल्या. रोमारियो शेफर्ड 6 चेंडूत 15 धावा करून नाबाद परतला.


सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात पराभव-


मुंबई इंडियन्सला गुजरात टायटन्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्या विरोधात पराभवाचा सामना करावा लागला असला तरी या सामन्यांमधील पराभव एकतर्फी झालेला नव्हता. मुंबईचा पराभव अटतटीच्या लढतीत झाला. गुजरात विरुद्ध मुंबईचा पराभव 6 धावांनी झाला होता. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबईचा पराभव 31 धावांनी झाला आहे. हैदराबादनं 3 विकेटवर 277 धावा केलेल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचा संघ 6 विकेटवर 246 धावा करु शकला. म्हणजेच मुंबईनं दोन्ही मॅचमध्ये अटीतटीच्या लढतीत पराभव स्वीकारला आहे. त्यामुळं आगामी सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स कमबॅक करेल अशी आशा मुंबईच्या चाहत्यांना आहे.






संबंधित बातम्या:


Mumbai Indians: मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा; हार्दिकच्या गटात इशान किशन, रोहितच्या गटात कोण?


RR Vs DC Dream11 prediction: जैस्वाल, बटलर, वॉर्नर, कोणाला बनवाल कर्णधार?; 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल


Kavya Maran: हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video