IPL 2022 : एक एप्रिल रोजी प्रिती झिंटाचा पंजाब आणि शाहरुख खानचा कोलकाता संघ यांच्यामध्ये लढत झाली. या लढतीत कोलकाता संघाने बाजी मारली. या सामन्याचं समालोचन करणाऱ्या सुरेश रैना आणि इरफान पठाणमध्ये राडा झाला. होय... पण हा खराखुरा वाद नाही... एक एप्रिल रोजी इरफान पठाण याने सुरेश रैनाची फिरकी घेतली.  कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स (KKR vs Punjab Kings) यांच्यातील सामन्यावेळी इरफान पठाण (Irfan Pathan) आणि सुरेश रैना (Suresh Raina) स्टार स्पोर्ट्सच्या लाईव्ह शोमध्ये आले होते, पण या कार्यक्रमादरम्यान दोघांमध्ये अचानक बिनसले. इरफान पठाण याने लाईव्ह शो सोडून जाणे योग्य समजले. तसेच प्रत्येक गोष्टीत फिमेल अँगल आणणं गरजेचं आहे का? अशी नाराजी सुरेश रैनाला बोलून दाखवली. त्यानंतर लाईव्ह कार्यक्रमातून निघून गेला. 


नेमकं झालं काय?
पंजाब आणि कोलकाता यांच्या सामन्याआधी इरफान पठाणने पंजाब संघ विजयाचा दावेदार असल्याचा अंदाज व्यक्त केली. यावरून सुरेश रैनाने इरफान पठाणवर निशाणा साधला. इरफान   पंजाबकडून तीन खेळला आहे, तसंच प्रिती झिंटा टीमची मालकीण आहे, असं रैना म्हणाला, यावरून इरफान पठाण संतापला. प्रत्येकवेळी महिलेचा अँगल आणायची गरज आहे का? असा सवालही उपस्थित केला. 


पण असं का झालं?
इरफान रागारात लाईव्ह शोमधून काढता पाय घेतला. त्यानंतर रैना इरफान पठाणला आणण्यासाठी गेला. घाबरलेल्या सुरेश रैनाला बघून इरफान पठाण जोरजोरात हसायला लागला. कारण रैनाला एप्रिल फूल केलं होतं. स्टार स्पोर्ट्सने हा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर टाकला आहे.


पाहा व्हिडीओ.... 






मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live