Rishabh Pant, IPL 2022 : भारताचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतला यंदाच्या आयपीएल हंगामात (IPL-2022) खास प्रदर्शन करता आले नाही. इतकेच नाही तर विकेटच्या पाठीमागे डीआरएसच्या निर्णायातही चूक झाली. त्यामुळे पंतवर टीकेची झोड उडाला होती. पण भारतीय क्रिकेट बोर्डाचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी ऋषभ पंतचे समर्थन केलेय. तसेच एमएस धोनीसोबत पंतची तुलना करणे चकीचं असल्याचेही सांगितलेय.
ऋषभ पंतला आयपीएलच्या 15 व्या हंगामात आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतने 14 सामन्यात 30.91 च्या सरासरीने 340 धावा केल्या आहेत. इतकेच नाही तर 14 सामन्यात पंतला एकही अर्धशतक झळकावता आले नाही. चांगली सुरुवात मिळाल्यानंतरही पंतने विकेट फेकली. त्याशिवाय पंतच्या नेतृत्वातील दिल्ली संघाचे आव्हान साखळी फेरीतचं संपुष्टात आले. गुणतालिकेत दिल्लीचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे.
यंदाच्या आयपीएल हंगामात ऋषभ पंतला निराशाजनक कामगिरीनंतर टीकेचा सामना करावा लागत आहे. त्याशिवाय डीआरएसच्या निर्णायावरुनही त्याला ट्रोल करण्यात आले.. याबाबत बोलताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पंतचा बचाव कला. कोलकातामधील एका कार्यक्रमावेळी बोलताना सौरव गांगुली म्हणाले की, पंतची तुलना एमएस धोनीसोबत करु नका.. ते बरोबर नाही. धोनीकडे खूप अनुभव आहे. धोनीने आयपीएल, कसोटी आणि एकदिवसीय, असे जवळपास 500 पेक्षा जास्त सामन्यात नेतृत्व केलेय. त्यामुळे धोनी आणि पंत यांची तुलना होणार नाही.. अथवा अशी तुलना करणे चुकीची आहे.
पंतचे करिअर -
24 वर्षीय ऋषभ पंतने 30 कसोटी, 24 एकदिवसीय आणि 43 टी 20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीत पंतच्या नावावर चार शतके आणि नऊ अर्धशतकांच्या मदतीने 1920 धावा आहेत. तर एकदिवसीय सामन्यात पाच अर्धशतकांच्या मदतीने 715 धावा आहेत. तर आंतरराष्ट्रीय टी 20मध्ये तीन अर्धशतकाच्या मदतीने 683 धावा केल्या आहेत.
हे देखील वाचा-
- AB de Villiers: टायगर अभी जिंदा है! पुढच्या हंगामात एबी डिव्हिलियर्सची आरसीबीच्या संघात होणार एन्ट्री
- IPL 2022: आयपीएलमधील खास विक्रमापासून युजवेंद्र चहल फक्त एक विकेट दूर, आजच्या सामन्यात रचणार इतिहास?
- GT vs RR : राजस्थानच्या पाच कमकुवत बाजू, हार्दिकचा गुजरात संघ याचाच घेऊ शकतो फायदा