Virender Sehwag : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेतील प्लेऑफचे सामने आजपासून सुरु होत आहेत. आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात क्वॉलीफायर 1 रंगणार आहे. दरम्यान आता आयपीएलच्या अंतिम सामन्याला काही दिवस शिल्लक असताना सर्व खेळाडूंच्या खेळावर एक प्रकारचं फिडबॅक क्रिकेट जगतातून उमटत आहे. यामध्ये भारताचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग (virendra sehwag) यानेही यंदाच्या हंगामातील त्याचा आवडता कर्णधार कोण? याचं उत्तर दिलं आहे. आयपीएल 2022 मधील सर्वात यशस्वी संघ गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच (Hardik Pandya) आवडता कर्णधार असल्याचं सेहवाग म्हटला आहे.


आज हार्दिकचा संघ गुजरात राजस्थान विरुद्ध पहिला क्वॉलीफायर सामना खेळणार आहे. यामध्ये विजय मिळवणारा संघ थेट अंतिम सामना खेळायला जाईल. तर पराभूत होणारा संघ एलिमिनेटर सामन्यातील विजेत्या संघासोबत क्वॉलीफायरचा दुसरा सामना खेळेल. दरम्यान या सामन्यात हार्दिकचा संघ मैदानात उतरण्यापूर्वी हार्दिकच्या नेतृत्त्वाचं कौतुक वीरेंद्र सेहवागने केलं आहे. ''हार्दिक कर्णधार म्हणून निर्णय घेताना शांत डोक्याने विचार करुन निर्णय घेतो. एक आक्रमक फलंदाज असूनही कर्णधार म्हणून अत्यंत संयमी निर्णय हार्दिक घेतो. तो दबाव असतानाही योग्य वेळी योग्य निर्णय घेतो,'' असंही सेहवाग म्हणाला. 


हार्दिकची आयपीएल 2022 मधील कामगिरी


यंदा हार्दिक एक उत्तम कर्णधार म्हणून खेळत असून खेळाडू म्हणूनही चांगली कामगिरी करत आहे. गुजरात टायटन्सकडून (GT) खेळताना हार्दिक पांड्याने 13 सामन्यात 413 रन केले आहेत. यावेळी त्याची सरासरी 41.30 असून स्ट्राइक रेट 131.52 इतका आहे. यावेळी त्याने 4 अर्धशतकं ठोकली असून 87 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. तो उत्तमप्रकारे गोलंदाजी देखील करत आहे.  


हे देखील वाचा-