Devon Conway CSK Record : आयपीएल 2022 (IPL 2022) च्या 49 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (Chennai Superkings vs Royal Challengers banglore) यांच्यात पार पडला. चेन्नईचा संघ 13 धावांनी पराभूत झाला. पण संघ पराभूत झाला असला तरी संघाचा सलामीवीर डेवॉन कॉन्वेने (Devon Conway) एक खास रेकॉर्ड नावे केा आहे. त्याने चेन्नईचा महान फलंदाज सुरेश रैनाचा (Suresh Raina) एक रेकॉर्ड तोडत स्वत:चं नाव दिग्गज क्रिकेटपटू मॅथ्यू हेडन, डेविड हसीच्या यादीत सामिल केलं आहे.


कॉन्वेने चेन्नईसाठी आतापर्यंत 3 सामने खेळले असून या तीन सामन्यात दमदार फलंदाजी करत 144 रन बनवले. त्यामुळे पहिले तीन डाव खेळत सर्वाधिक धावा करण्याच्या यादीच तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. याआधी सुरेश रैनाने 3 सामन्याक 113 रन केले होते.  हेडनने (Mathew hayden) 176 रन आणि डेविड हस्सीने (David Hussey) 168 रन केले आहेत. विशेष म्हणजे यंदा चेन्नई सुपरकिंग्स संघाने आयपीएल महालिलावात (IPL Mega Auction 2022) न्यूझीलंडच्या या खेळाडूला 1 कोटींच्या बेस प्राइसमध्ये विकत घेतलं होतं. त्याचा आयपीएलचा हा पहिला सीजन असून त्याने सुरुवातीच्या तीन सामन्यात दोन अर्धशतकं झळकावली आहेत.


3 डावानंतर सीएसकेसाठी सर्वाधिक धावा करणारे महारथी


176 - मॅथ्यू हेडन
168 - मायकल हसी
144 - डेवोन कॉन्वे
113 - सुरेश रैना


हे देखील वाचा-