India T20 WC 2024 Squad Announcement Upates : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्धात बीसीसीआयकडून लवकरच टी20 विश्वचषकासाठी 15 शिलेदारांची घोषणा करण्यात येईल. दिल्लीमध्ये अजित आगरकर आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये टी20 विश्वचषकासंदर्भात बैठक झाल्याचं समोर आलेय. रिपोर्ट्सनुसार, विश्वचषकासाठी टीम इंडियाचे 15 शिलेदार जवळपास निश्चित झाले आहे. लवकरच टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची घोषणा कऱण्यात येणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियात काही नव्या खेळाडूंना स्थान मिळू शकते, तर काही अनुभवी खेळाडूंचा पत्ता कट होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. हार्दिक पांड्याबाबत रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांच्यामध्ये सखोल चर्चा झाली. पांड्याचा फॉर्म चिंतेचा विषय ठरलाय. पांड्याला गोलंदाजी आणि फलंदाजीत अद्याप प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे पांड्याबाबत काय निर्णय होणार याची चर्चा सुरु आहे. 


केएल राहुलचा पत्ता कट होणार? 


15 जणांच्या चमूमध्ये दोन विकेटकपीरला स्थान देण्यात येईल. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी तीन विकेटकीपरमध्ये स्पर्धा सुरु आहे. ऋषभ पंत यानं दुखापतीनंतर शानदार कमबॅक केलेय. पंतने खोऱ्यानं धावा चोपल्या आहेत. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला आहे. ऑरेंज कॅप स्पर्धेतही तो टॉप 5 फलंदाजामध्ये आहे. त्यामुळे पंत यानं नाव निश्चित मानले जातेय. रिपोर्ट्सनुसार, केएल राहुल याचाही समावेश जवळपास निश्चित मानला जातोय. त्यामुळे केएल राहुल, जितेश शर्मा, ईशान किशन आणि दिनेश कार्तिक यांचा पत्ता कट झाल्यात जमा आहे. 


शुभमन गिलही बाहेर ? 


शुभमन गिल याची निवड होण्याची शक्यता नसल्याचं रिपोर्ट्सनुसार समोर आले आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल हे टीम इंडियासाठी सलामीची भूमिका पार पाडतील. विराट कोहली तिसरा सलामी फलंदाज म्हणून पर्याय असल्याचा बीसीसीआय विचार करत आहे. रिंकू सिंह आणि शिवम दुबे यांना स्थान देण्यासाठी टीम इंडिया अधिकचा फलंदाज निवडणार नसल्याचं समोर आलेय.  रोहित शर्मा, यशस्वी जायस्वाल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव.. हे भारताचे आघाडीचे फलंदाज असतील असे रिपोर्ट्सनुसार समोर आलेय. 


अक्षर पटेल बाबत सपन्सेस - 


रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादव यांचं स्थान निश्चित मानले जातेय. युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल यांच्यामध्ये स्पर्धा सुरु आहे. दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. त्याशिवाय रवि बिश्नोई हाही स्पर्धेत आहे. त्यामुळे कोणत्या एका फिरकी गोलंदाजाला स्थान दिले जातेय, हे पाहावं लागेल. 


सिराजला स्थान मिळणार का? 


जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंह यांचं नाव निश्चित झालेय. पण तिसऱ्या गोलंदाजासाठी स्पर्धा सुरु आहे. जसप्रीत बुमराह, आवेश खान यांच्यापैकी एकाची निवड होऊ शकते. 


टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाचे संभाव्य 15 शिलेदार -
 
रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, यशस्वी जायस्वाल, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), रिंकू सिंह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल/अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज/आवेश खान, अर्शदीप सिंह, संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे