DC vs KKR: कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात काल विशाखापट्टणम येथे सामना खेळला गेला. केकेआरने प्रथम खेळताना 272 धावा केल्या. काल झालेल्या सामन्यांत सुनील नारायणने दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीचे कंबरडे मोडले होते. तसेच डावाच्या शेवटी स्फोटक फलंदाजी करत आंद्रे रसेल दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई केली.
दिल्ली आणि कोलकात्या सामन्यानंतर नारायण आणि रसेलच्या खेळीचे कौतुक होत असताना केकेआरचा युवा फलंदाज अंगक्रिश रघुवंशी याच्या खेळीचीही चर्चा होत आहे. अंगक्रिश रघुवंशीने दिल्लीविरुद्ध 27 चेंडूत 5 चौकार आणि 3 गगनचुंबी षटकार मारत 54 धावांची खेळी केली आहे. त्याने आरसीबीविरुद्धच्या सामन्यात इम्पॅक्ट खेळाडू म्हणून आयपीएलमध्ये पदार्पण केले. काल केकेआरविरुद्ध त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं.
कोण आहे अंगक्रिश रघुवंशी?
अंगक्रिश रघुवंशीचा जन्म 5 जून 2005 रोजी झाला. त्याचे क्रिकेट कौशल्य सुधारण्यासाठी त्याने गुडगाव सोडले आणि वयाच्या 11 व्या वर्षी मुंबईत आले. अंगक्रिश हा टॉप ऑर्डरचा फलंदाज आहे आणि तो ऑफ-स्पिन गोलंदाजीही करू शकतो. अंडर-19 क्रिकेट विश्वचषक 2022 मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप प्रसिद्धी मिळाली.अंगक्रिश विश्वचषकात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने 2022 च्या विश्वचषकात 6 सामने खेळून 278 धावा केल्या होत्या.
आई अन् वडिलांनी केले आहे भारताचे प्रतिनिधित्व
अंगक्रिश रघुवंशी हा खेळाडूंच्या कुटुंबातून आला आहे. अंगक्रिश रघुवंशी लहानपणापासूनच खेळाडू बनणे जवळजवळ निश्चित होते कारण तो खेळाडूंच्या कुटुंबातून आला आहे. त्याची आई मलिका रघुवंशी यांनी बास्केटबॉलमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचे वडील अवनीश हे भारतासाठी टेनिस खेळले आहेत. त्याचा भाऊ क्रिशांग रघुवंशी हा देखील वडिलांप्रमाणे टेनिस खेळतो. याशिवाय त्याचे काका भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईसाठी क्रिकेट खेळले आहेत.
20 लाखात केकेआरने खरीदे केले-
प्रशिक्षक मन्सूर अली खान यांच्या नेतृत्वाखाली आंगकृष्ण रघुवंशी यांनी गुडगावमध्ये क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली. काही काळानंतर, देशांतर्गत क्रिकेट खेळलेल्या अंगक्रिशच्या काकांनी त्याला मुंबईला जाण्याचा सल्ला दिला, जिथे त्याला अभिषेक नायरच्या हाताखाली प्रशिक्षण घेण्याची संधी मिळाली. आयपीएल 2024 बद्दल बोलायचे झाले तर, केकेआरने अंगक्रिशला त्याच्या बेस प्राईस म्हणजेच 20 लाख रुपयांना विकत घेतले.
संबंधित बातमी:
आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, Photos