DC vs SRH, Qualifier 2 : आयपीएल 2020 मधील दुसरा क्वालिफायर सामना आज संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएलच्या यंदाच्या सीझनच्या फायनल्समध्ये प्रवेश करणार आहे. 10 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आयपीएल 2020च्या फायनल्समध्ये आज विजयी होणारा संघ मुंबई इंडियन्ससोबत भिडणार आहे.


हैदराबादच्या रिद्धिमान साहाबाबत अद्याप संघाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जर साहा फिट असेल तर तो श्रीवत्स गोस्वामीच्या ऐवजी संघात जागा घेऊ शकतो. याव्यतिरिक्त सनरायझर्स हैदराबाद संघात कोणतेही बदल करणार नसल्याची माहिती मिळत आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्सचा संघ या महत्त्वाच्या सामन्यात अनेक बदलांसह मैदानात उतरणार आहे.





गेल्या चार सामन्यांपासून हैदराबादच्या संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या जेसन होल्डरने संघाच्या यशाचं गुपित उलगडलं आहे. सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांनी मागील पाच सामन्यांमध्ये विरोधी संघाला 150 धावांपेक्षा कमी धावांवर रोखलं. संघाने आपल्या शानदार गोलंदाजीच्या जीवावर गेल्या पाच सामन्यांमध्ये विरुद्ध संघाला 131, 149, 120, 131 आणि 126 धावांवरच रोखलं आहे.


दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी ओपनर पृथ्वी शॉ चिंतेची बाब बनला आहे. पृथ्वी शॉने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये 13 सामन्यांमध्ये 228 धावा केल्या आहेत. गेल्या 8 सामन्यांमध्ये पृथ्वीच फारशी चांगली कामगिरी करू शकलेला नाही. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स पृथ्वी शॉला क्वालिफायर 2 मधून बाहेर ठेवू शकते.





दरम्यान, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद आयपीएल 2020च्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी आज होणाऱ्या क्वॉलिफायरमध्ये एकमेकांविरोधात लढण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन्ही संघ आजच्या सामन्यात विजय मिळवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करताना दिसतील. आजच्या सामन्यात विजयी होणारा संघ आयपीएल 2020च्या 13व्या सीझनच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सविरोधात मैदानावर उतरणार आहे. तसेच आजच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागणारा संघाचा आयपीएल 2020 मधील प्रवास इथेच थांबणार आहे.


आजच्या सामन्यासाठी संभाव्य संघ :


दिल्ली कॅपिटल्स : अजिंक्य रहाणे, शिखर धवन, श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शिमरन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, अक्षर पटेल, आर अश्विन, हर्षल पटेल, एनरिक नॉर्टजे आणि कगीसो रबाडा.


सनरायझर्स हैदराबाद : डेविड वार्नर, श्रीवत्स गोस्वामी/रिद्धिमान साहा (विकेटकीपर), मनीष पांडे, केन विलियमसन, प्रियम गर्ग, जेसन होल्डर, अब्दुल समद, राशिद खान, शाहबज नदीम, टी नटराजन आणि संदीप शर्मा.


महत्त्वाच्या बातम्या :