DC vs SRH IPL 2024: दिल्लीला होमग्राऊंडवर लोळवलं, सनरायजर्सची गुणतालिकेत मोठी झेप, चेन्नईला मागं टाकलं

DC vs SRH IPL 2024: गुणतालिकेत दिल्ली सध्या सहाव्या क्रमांकावर असून हैदराबादचा संघ चौथ्या स्थानावर आहे. 

मुकेश चव्हाण Last Updated: 20 Apr 2024 11:24 PM
दिल्लीचा होम ग्राऊंडवर पराभव, सनरायजर्स हैदराबादचा पाचवा विजय

दिल्लीचा होम ग्राऊंडवर पराभव झाला आहे. सनरायजर्स हैदराबादनं यंदाच्या आयपीएलमधील पाचवा विजय मिळवला आहे. 

दिल्लीला सहावा धक्का?

दिल्लीला सहावा धक्का बसला आहे. ललित यादव 7 धावा करुन बाद झाला आहे.

दिल्लीला पाचवा धक्का, ट्रिस्टन स्टब्स बाद

दिल्ली कॅपिटल्सला पाचवा धक्का ट्रिस्टन स्टब्सच्या रुपानं बसला आहे.  स्टब्सनं 10 धावा केल्या आहेत.

दिल्लीला चौथा धक्का, मयंक मार्कंडेनं घेतली पोरेलची विकेट

दिल्लीला 135 धावांवर चौथा धक्का बसला आहे. अभिषेक पोरेल 42 धावा करुन बाद झाला. 

जॅक फ्रेजर मॅक्गर्क 65 धावांवर बाद

जॅक फ्रेजर मॅक्गर्क 65 धावांवर बाद झाला आहे. दिल्लीला हा तिसरा धक्का बसला 

दिल्लीच्या 100 धावा पूर्ण, जॅक फ्रेजर मॅक्गर्कचं अर्धशतक

दिल्लीच्या शंभर धावा 7 व्या ओव्हरमध्ये पूर्ण झाल्या आहेत. जॅक फ्रेजर मॅक्गर्कनं 15 बॉलमध्ये अर्धशतक झळकवलं आहे. 

दिल्लीचा पलटवार, पॉवरप्लेमध्ये 2 बाद 88 धावा

दिल्ली कॅपिटल्सनं देखील सनरायजर्स हैदराबादला प्रत्युत्तर दिलं आहे. पॉवरप्लेमध्ये त्यांनी 6 ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सनं 2 बाद 88 धावा केल्या.

हैदराबादच्या 7 विकेटवर 266 धावा

हैदराबादसाठी ट्रेविस हेडनं 89, अभिषेक शर्मानं 46,  हेनरिक क्लासेननं 15, नितीशकुमार रेड्डीनं 37, शहाबाझ अहमदनं देखील अर्धशतक झळकावलं. शहाबाझ अहमदनं 59 धावा केल्या.  यासर्वांच्या खेळीच्या जोरावर हैदराबादनं 7 विकेटवर 266 धावा केल्या. 

हैदराबादला सहावा धक्का, अब्दुल समद बाद

सनरायजर्स हैदराबादला सहावा धक्का बसला आहे. अब्दुल समदनं 13 धावा केल्या. 

हैदराबादच्या 250 धावा पूर्ण

सनरायजर्स हैदराबादनं 19 ओवरमध्ये 250 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. 

हैदराबादला पाचवा धक्का, नितीशकुमार रेड्डी 37 धावांवर बाद

सनरायजर्स हैदराबादला कुलदीप यादव आणखी एक धक्का दिला आहे. नितीशकुमार रेड्डी 37 धावा केल्या. कुलदीप यादवनं आज चार विकेट घेतल्या.

हैदराबादच्या 200 धावा पूर्ण

सनरायजर्स हैदराबादनं 15 व्या ओव्हरमध्येच 200 धावांचा टप्पा पार केला आहे. 

अक्षर पटेलचा हैदराबादला चौथा धक्का

अक्षर पटेलनं हैदराबादला चौथा धक्का दिला आहे.  हेनरिक क्लासेनला अक्षर पटेलनं बाद केलं. 

हैदराबादला तिसरा धक्का, ट्रेविस हेड 89 धावांवर बाद

सनरायजर्स हैदराबादला तिसरा धक्का बसला आहे. ट्रेविस हेड 89 धावा करुन बाद झाला. 

हैदराबादला पहिला धक्का, अभिषेक शर्मा बाद

हैदराबादला पहिला धक्का बसला असून कुलदीप यादवनं अभिषेक शर्माला बाद केलं. 

हैदराबादच्या पाच ओव्हरमध्येच 100 धावा

सनरायजर्स हैदराबादनं पाच ओव्हरमध्येच शंभर धावा केल्या आहेत. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं जोरदार फटकेबाजी केली आहे. 

SRH vs DC : सनरायजर्स हैदराबादची आक्रमक सुरुवात

सनरायजर्स हैदराबादनं आक्रमक सुरुवात केली असून पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी 15 धावा केल्या आहेत. ट्रेविस हेडनं खलील अहमदच्या पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा काढल्या.

SRH vs DC : हैदराबादच्या संघात दिल्ली विरुद्ध कुणाला संधी?

अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, ए. मार्क्रम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर) नितीशकुमार रेड्डी, अब्दुल समद, पॅट कमिन्स (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार, एम. मार्कंडे, टी. नटराजन

DC vs SRH: दिल्ली कॅपिटल्समध्ये कुणाला संधी

डेव्हिड वॉर्नर, जॅक फ्रेजर मॅक्गर्क, रिषभ पंत (कॅप्टन / विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, नॉर्खिया, खलील अहमद, मुकेश कुमार, एल. यादव

दिल्लीनं टॉस जिंकला, बॉलिंग करण्याचा रिषभ पंतचा निर्णय

दिल्ली कॅपिटल्सनं टॉस जिंकला असून रिषभ पंतनं पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. 

DC vs SRH IPL 2024: थोड्याच वेळात टॉस होणार

दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात थोड्याच वेळात टॉस होणार आहे. 

DC vs SRH Live Score : दिल्लीच्या बॉलर्सपुढं आव्हान 

दिल्ली कॅपिटल्सच्या बॉलर्सपुढं पॉवरप्लेमध्ये दमदार फलंदाजी करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादचं आव्हान असेल. इशांत शर्मा, खलील अहमद आणि मुकेश कुमार यांच्यापुढं हे आव्हान असेल. 

DC vs SRH : दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यापूर्वी कोण वरचढ ठरलं?

दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद यापूर्वी 23 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये सनरायजर्स हैदराबादनं 12 वेळा तर दिल्ली कॅपिटल्सनं 11 वेळा विजय मिळवला आहे. 

सनरायझर्स हैदराबादचे प्रशिक्षक काय म्हणाले?

आज कोणाचं वर्चस्व राहणार?

हैदराबाद संघाने त्यांच्या 6 पैकी 4 सामने जिंकले असून ते सध्या गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहेत. तर दिल्ली संघाने सलग 2 विजय मिळवले असून गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. दोन्ही संघ आतापर्यंत 23 वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी हैदराबादने 12 आणि दिल्लीने 11 सामने जिंकले आहेत. 

सनरायझर्स हैदराबाद संभाव्य Playing XI-

अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन, एडन मार्कराम, अब्दुल समद, नितीश कुमार रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट आणि टी नटराजन.

दिल्ली कॅपिटल्स संभाव्य Playing XI-

पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर/सुमित कुमार, जॅक फ्रेझर मॅकगर्क, शे होप, ऋषभ पंत, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा आणि खलील अहमद.

खेळपट्टी कशी असेल?

अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी आधी कमी स्कोअरिंग ट्रॅक म्हणून ओळखला जात होती. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी येथील खेळपट्टीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला. आता येथील खेळपट्ट्या फलंदाजांसाठी चांगल्या बनल्या आहेत. त्यामुळे या मैदानावर उच्च स्कोअरिंग सामने होतात. येथे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करू करताना पाहायला मिळते.

अभिषेक शर्माची तुफान फटकेबाजी

दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ:

पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ऋषभ पंत (w/c), सुमित कुमार, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद, कुमार कुशाग्रा, प्रवीण दुबे, ललित यादव, लिझाद विल्यम्स, डेव्हिड वॉर्नर, झ्ये रिचर्डसन, एनरिक नॉर्टजे, यश धुल, मिचेल मार्श, रिकी भुई, रसिक दार सलाम, विकी ओस्तवाल, स्वस्तिक चिकारा

सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ:

अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेनरिक क्लासेन (w), एडन मार्कराम, अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (c), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव, झटावेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, विजयकांत व्यासकांत, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंग, मयंक अग्रवाल

दिल्लीचं ट्विट

दिल्ली कॅपिटल्सचे पुनरागमन

ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली, दिल्ली कॅपिटल्सने खराब सुरुवातीनंतर आता पुनरागमन केले आहे आणि आयपीएलच्या 35 व्या सामन्यात त्यांचा सामना चांगली कामगिरी करणाऱ्या सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे.

पार्श्वभूमी

Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad IPL 2024: आज दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात 35 वी लढत सुरु आहे. दिल्लीतील अरुण जेटली मैदानात हा सामना सुरु आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कॅप्टन रिषभ पंतनं टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं हैदराबादला वादळी सुरुवात करुन दिली. पॉवरप्लेमध्ये ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मानं 125 धावा केल्या.  पॉवरप्लेनंतर कुलदीप यादवनं विकेट घेतल्यानं हैदराबादच्या धावसंख्येचा वेग कमी झाला. कुलदीप यादवनं चार विकेट घेतल्या. मुकेश कुमारनं एक तर अक्षर पटेलनं एक विकेट घेतली. 


हैदराबादसाठी ट्रेविस हेडनं 89, अभिषेक शर्मानं 46,  हेनरिक क्लासेननं 15, नितीशकुमार रेड्डीनं 37, शहाबाझ अहमदनं देखील अर्धशतक झळकावलं. शहाबाझ अहमदनं 59 धावा केल्या.  यासर्वांच्या खेळीच्या जोरावर हैदराबादनं 7 विकेटवर 266 धावा केल्या. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.