KXIP vs DC, Super Over IPL Final Score : सुपर ओव्हरमध्ये दिल्लीचा विजय; मयंक अग्रवालची खेळी व्यर्थ

DC vs KXIP Live Score Updates: : आयपीएल 13 व्या सीजनचा दुसरा सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) यांच्यात रंगणार आहे. पंजाबने नाणेफेक जिंकून पहिल्यांदी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Sep 2020 11:52 PM
दिल्ली कॅपिटल्स संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 157 धावा काढल्या. पंजाबच्या संघासमोर 158 धावांचे लक्ष्य होते. मात्र, पंजाबची टीम 20 ओव्हरमध्ये आठ गडी गमावून 157 धावांपर्यंत मजल मारु शकली. मॅच टाय झाल्याने आता सुपर ओव्हरमध्ये सामान्याचा निकाल लागणार आहे.
पंजाबला जिंकण्यासाठी 6 चेंडूत 13 धावांची आवश्यकता
मयंक अग्रवालचे अर्धशतक; पंजाबला जिंकण्यासाठी 18 चेंडूत 42 धावांची गरज
#IPL2020 #DCvsKXIP दिल्ली कॅपिटल्सचं किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर 158 धावांचं आव्हान, दिल्लीकडून मार्कस स्टोइनीसच्या सर्वाधिक 53 धावा
दिल्ली कॅपिटल्स फलंदाजी करणारण्यासाठी मैदानात उतरली आहे. मात्र, आजच्या सामन्यात विस्फोटक फलंदाज क्रिस गेलला संधी मिळालेली नाही.
दिल्लीकडून सलामीला शिखर धवन आणि पृथ्वी शॉ धावपट्टीवर उतरले आहेत. दिल्लीने एक ओव्हरमध्ये विनाबाद 5 धावा काढल्यात.
दिल्लीला दुसऱ्याच ओव्हरमध्ये मोठा झटका. शिखर धवन शून्यावर आउट. पंजाबची चांगली सुरुवात
दिल्लीला सहावा धक्का, दिल्ली कॅपिटल्स 16 ओव्हर नंतर 96/6

पार्श्वभूमी

IPL 2020, DCvKXIP : आयपीएल 13 व्या सीजनचा दुसरा सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात रंगणार आहे. पण सामन्याआधी दिल्ली कॅपिटल्सला मोठ झटका बसला आहे. क्रिकबजच्या वृत्तानुसार, दिल्लीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा सराव सत्रात जखमी झाला आहे. त्यामुळे त्याला आजचा पहिला सामना खेळता येणार नाही, अशी दाट शक्यता आहे.


 


इशांतला पाठीला दुखापत झाली आहे. यापूर्वीही त्याला अनेकदा दुखापत झाली आहे. यावर्षी जानेवारीत इशांतला घोट्याला दुखापत झाली होती. एका महिन्यानंतर, तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मैदानात परतला होता, परंतु तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला, त्यादरम्यान त्याला पुन्हा घोट्यात दुखापत झाली.


 


IPL 2020, DC vs KXIP Squads: किंग्स इलेवन पंजाब (प्लेइंग इलेवन): लोकेश राहुल (विकेटकीपर/ कॅप्टन), मयंक अग्रवाल, करुण नायर, सरफराज खान, ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पूरन, कृष्णप्पा गौथम, क्रिस जॉर्डन, शेल्डन कॉटरेल, रवि बिश्नोई, मोहम्मद शमी.


 


KXIP vs DC IPL 2020, DC Squad: दिल्ली कैपिटल्स ची प्लेइंग इलेवन- शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर (कॅप्टन), ऋषभ पंत (विकेटकीपर), शिमरन हेटमायर, मार्कस स्टोइनिस, अक्षर पटेल, आर अश्विन, मोहित शर्मा, एनरिक नॉर्टजे और कगीसो रबाडा.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.