CSK vs DC, IPL 2023 : आज, 20 मे रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) आयपीएलच्या (IPL 2023) 67 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्स संघाशी होणार आहे. या मैदानावरील चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा हा शेवटचा सामना ठरू शकतो. यामुळेच चेन्नईचा संघ (CSK) कोणत्याही परिस्थितीत विजयासह संघाला प्लेऑफची भेट देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेल. यंदाच्या आयपीएलनंतर धोनी निवृत्ती घेईल, अशी चर्चा आहे. याबाबत धोनीनं अधिकृत घोषणा केली नसली, तरी निवृत्तीच्या चर्चांमुळे चेन्नईचे चाहते अत्यंत भावूक झालेले दिसून येत आहे. 


चेन्नईसाठी 'करो या मरो'ची परिस्थिती


चेन्नई संघासाठी आजचा सामना करा किंवा मरो असा असेल. दिल्लीविरुद्ध हरणं चेन्नईला परवडणार नाही. चेन्नई संघाकडे 13 सामन्यांनं 15 गुण आहेत. आजचा सामना जिंकल्यास चेन्नईला प्लेऑफमध्ये प्रवेश करेल. पण, विजयानंतर चेन्नई प्लेऑफमध्ये दुसऱ्या स्थानावर प्रवेश करेल की तिसऱ्या स्थानावर हे शनिवारी संध्याकाळी लखनौ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्यानंतरच कळेल. चेन्नईचा नेट रनरेट +0.381 आहे, तर लखनौ संघाचा +0.304  नेट रनरेट आहे. चेन्नई संघाचा नेट रनरेट लखनौपेक्षा चांगला आहे.


धोनीच्या निवृत्तीची चर्चा


अशात जर यंदाचा हंगाम धोनीचा शेवटचा आयपीएल हंगाम असल्यास संघही त्याला खास भेट म्हणून यंदा आयपीएल चॅम्पियन बनण्यासाठी पुरेपुर प्रयत्न करेल. दिल्ली आणि चेन्नईचा यंदाच्या आयपीएलमधील शेवटचा साखळी सामना असेल. चेन्नईने हा सामना जिंकल्यास  संघाला प्लेऑफचं तिकीट मिळेल. तर दिल्ली प्लेऑफच्या स्पर्धेतून आधीर बाहेर गेला आहे.


कुठे आणि कधी रंगणार सामना?


आयपीएलच्या सोळाव्या हंगामात आज दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) या दोन संघात लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) दुपारी 3.30 वाजता रंगणार आहे. दुपारी 3 वाजता नाणेफेक होईल.


DC vs CSK Head to Head : हेड टू हेड आकडेवारी


आयपीएलच्या इतिहासात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये आतापर्यंत 28 सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी चेन्नई संघाने 18 सामने जिंकले आहेत. दुसरीकडे दिल्ली संघाला केवळ 10 सामने जिंकता आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत चेन्नई संघ वरचढ ठरला आहे.


Pitch Report : खेळपट्टीचा अहवाल


हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दुपारी होणार आहे. अशा स्थितीत दव पडण्याची शक्यता नाही. दिल्लीच्या खेळपट्टीवर आतापर्यंत फिरकी गोलंदाजांची एकतर्फी कामगिरी पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत या मैदानावर खेळल्या गेलेल्या 83 सामन्यांपैकी पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने 36 वेळा विजय मिळवला आहे. तर लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघाने 46 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे नाणेफेक कोण जिंकतं हेही महत्त्वाचं ठरेल.


DC vs CSK Probable Playing 11 : संभाव्य प्लेईंग 11


दिल्ली कॅपिटल्स


डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), रिली रुसो, पृथ्वी शॉ, अमन हकीम खान, यश धुल, अक्षर पटेल, फिलीप सॉल्ट (विकेटकीपर), एनरीज नॉर्टजे, खलील अहमद, केएल यादव, इशांत शर्मा.


चेन्नई सुपर किंग्स


ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा.