CSK vs DC, Chepauk Stadium Pitch Report : आयपीएल 2023 च्या 67 व्या सामन्यात आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर (Arun Jaitley Stadium) आयपीएल 2023 (IPL 2023) च्या 67 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) सामना दिल्ली कॅपिटल्सशी (DC) होणार आहे. 20 मे रोजी दुपारी 3.30 वाजता हा सामना रंगणार आहे. एमएस धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स आणि डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्त्वात दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आजचा सामना रंगणार आहे. 


चेन्नई आणि दिल्ली आमने-सामने


चेन्नई सुपर किंग्सने या मोसमात चेन्नई सुपर किंग्स संघाने आतापर्यंतच्या 13 सामन्यांपैकी सात सामने जिंकले तर पाच सामने गमावले असून संघाकडे 15 गुण आहेत. या उलट दिल्ली कॅपिटल्स संघ गुणतालिकेत सर्वात शेवटी असून संघाकडे आठ गुण आहेत. दिल्ली संघाला यंदाच्या हंगामातील 13 पैकी फक्त पाच सामने जिंकता आले असून आठ सामन्यांमध्ये संघाला पराभव पत्करावा लागला आहे.


Arun Jaitley Stadium Pitch Report : कशी असेल खेळपट्टी?


आजचा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडणार आहे. या मैदानावर अनेक मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आहेत. आयपीएलमध्ये अनेकवेळा या मैदानावर संघाने 200 च्या पुढे धावा केल्या आहेत. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी टी-20 सामन्यात फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर ठरली आहे. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. येथे चेंडू बॅटवर चांगला येतो आणि फलंदाज याचा आनंद घेतात.


CSK vs DC Probable Playing 11 : दोन्ही संघांची प्लेईंग 11


CSK Probable Playing 11 : चेन्नई सुपर किंग्स


ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे, मोईन अली, रविंद्र जडेजा, शिवम दुबे, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकिपर), दीपक चहर, तुषार देशपांडे, महेश तीक्षणा.


DC Probable Playing 11 : दिल्ली कॅपिटल्स


डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), रिली रुसो, पृथ्वी शॉ, अमन हकीम खान, यश धुल, अक्षर पटेल, फिलीप सॉल्ट (विकेटकीपर), एनरीज नॉर्टजे, खलील अहमद, केएल यादव, इशांत शर्मा.


लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


CSK vs DC Match Preview : चेन्नई प्लेऑफमध्ये पोहचणार की दिल्ली मार्ग खडतर करणार? हेड टू हेड आकडेवारी काय सांगते पाहा