CSK vs RR, IPL 2022 : राजस्थान संघाने अखेरच्या साखळी सामन्यात अश्विनच्या अष्टपैलू खेळीच्या बळावर राजस्थानने चेन्नईचा पाच विकेटने पराभव केला. अश्विनने गोलंदाजीत महत्वाची एक विकेट घेतली तर फलंदाजीमध्ये नाबाद 40 धावांची खेळी केली. चेन्नईने दिलेले 151 धावांचे आव्हान चेन्नईने पाच गड्यांच्या मोबदल्यात यशस्वी पार केले. या विजयासह राजस्थानच्या संघाने गुणतालिकेत टॉप 2 मध्ये प्रवेश केलाय. 24 मे रोजी राजस्थान आणि गुजरात संघामध्ये क्वालिफायर 1 चा सामना होणार आहे.
151 धावांचा आव्हान पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात खराब झाली. तुफान फॉर्मात असलेला जोस बटलर अवघ्या दोन धावा काढून माघारी परतला. त्यानंतर कर्णधार संजू सॅमसनही 15 धावा काढून बाद झाला. देवदत्त पडिकल तीन धावा काढून बाद झाला.. पण त्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि आर अश्विन यांनी डाव सावरला. जोडी जमली असे वाटत असतानाच 59 धावांवर यशस्वी बाद झाला. यशस्वीने संयमी फलंदाजी करत संघाचा डाव सावरला. यशस्वी बाद झाल्यानंतर आर अश्विनने सामन्याची सर्व सुत्रे आपल्याकडे घेतली. अश्विनने रियान परागसोबत राजस्थानला विजय मिळवून दिला. अश्विन आणि रियान पराग यांनी 20 चेंडूत 39 धावांची भागिदारी केली. अश्विनने नाबाद 40 धावांची खेळी केली. रियान पराग 10 धावांवर नाबाद राहिला.
अखेरच्या साखळी सामन्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोईने अलीच्या 93 धावांच्या वादळी खेळीच्या बळावर निर्धारित 20 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात चेन्नईने केवळ 150 धावा केल्या.
सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकत चेन्नईने फलंदाजी घेतली. पण सलामीवीर ऋतुराज स्वस्तात बाद झाला. कॉन्वेही 16 धावा करण्यातच यशस्वी झाला. मोईने अलीने सुरुवातीपासून दमदार फलंदाजी सुरु ठेवली. पण त्याला खास कोणाचीच साथ मिळाली नाही. केवळ धोनीने 26 धावांची खेळी केली, इतर फलंदाज दुहेरी आकडेवारीही गाठू शकले नाहीत. चेन्नईकडून एकही मोठी भागिदारी झाली नाही. चेन्नईचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद झाले. ऋतुराज गायकवाड 2, डेविन कॉन्वे 16. एन जगदीशन 1, अंबाती रायडू 3, धोनी 26 यांना मोठी खेळी करता आली नाही. मोईन अलीने एकाकी झुंज देत 93 धावांची खेळी केली.
राजस्थानकडून सर्वच गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. पण ओबेद मेकॉयने सर्वोत्कृष्ट कामगिरी करत 4 षटकात 20 धावा देत 2 विकेट्स नावे केल्या आहेत. तर चहलनेही दोन तर आश्विन आण बोल्टने प्रत्येकी एक विकेट घेतली.