IPL 2023 RCB vs CSK, Match : आज आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये आज दोन सामने खेळवले जाणार आहेत. पहिला सामना दुपारी 3.30 वाजता चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) यांच्यात पाहायला मिळणार आहे. बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडिअमवर (M. Chinnaswamy Stadium) हा रोमांचक सामना  (CSK vs RCB) रंगणार आहे. 


RCB vs CSK, IPL 2023 : चेन्नई विरुद्ध आरसीबी


आयपीएल 2023 मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स हा रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर विराट कोहली आणि एमएस धोनी यांच्यातील आणखी एका लढतीसाठी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आयपीएल 2023 मध्ये दोन्ही संघांनी आतापर्यंत चारपैकी दोन सामने जिंकले आहेत. चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्सविरुद्धचा मागील सामना केवळ तीन धावांच्या फरकाने गमावला होता. आरसीबीने त्यांच्या मागील सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 23 धावांनी पराभव करत 20 षटकात 6 गडी गमावून एकूण 174 धावा केल्या. 


CSK vs RCB Head to Head : कुणाचं पारड जड? पाहा काय सांगते आकडेवारी


इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या दोन संघांमध्ये आतापर्यंत 33 सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये चेन्नई संघाचं पारड जड दिसून आलं आहे. चेन्नई सुपर किंग्सने 30 पैकी 19 सामने जिंकले आहेत. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला फक्त 10 सामने जिंकता आले आहेत. दोन्ही संघांची सर्वाधिक सरासरी धावसंख्या 200 आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


CSK vs RCB, IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?


चेन्नई (CSK) आणि आरसीबी (RCB) यांच्यात 17 एप्रिलला लढत पाहायला मिळणार आहे. हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियम (M. Chinnaswamy Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता पार पडणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


CSK vs RCB Playing 11: धोनी विरुद्ध कोहली; हे 11 खेळाडू मैदानात उतरणार; खेळपट्टी कशी आहे? वाचा सविस्तर