Most wickets in IPL: आयपीएल (IPL) 2022 आता अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये गुजरात टायटन्स प्ले ऑफमध्ये पोहोचला आहे. तर 3 संघ लवकरच अंतिम लढतीसाठी सज्ज होतील. प्रत्येक हंगामाप्रमाणे यावेळीही इंडियन प्रीमियर लीगमध्ये धावांचा पाऊस पडत आहे. गोलंदाज विकेटही घेत आहेत. चालू हंगामात आत्तापर्यंत सर्वात जास्त विकेट युझवेंद्र चहलने आपल्या नावावर केल्या आहेत. दरम्यान, आयपीएलच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक विकेट्स कोणत्या खेळाडूने घेतल्या याबाबतची माहिती आपल्याला आहे का? जाणून घेऊयात एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंबद्दल....


आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हर्षल पटेल, ड्वेन ब्राव्हो, कागिसो रबाडा, लसिथ मलिंगा आणि जेम्स फॉकनर यांच्या नावांचा समावेश आहे.


हर्षल पटेल


आयपीएल 2021 मध्ये  हर्षल  पटेलने शानदार कामगिरी केली होती. आयपीएलच्या 14 व्या मोसमात तो 15 सामने खेळला होता. या 15 सामन्यात त्याने 56.2 षटके टाकली होती. यादरम्यान त्याने 459 धावा दिल्या होत्या. हर्षल पटेलने 2021 मध्ये 14.34 च्या सरासरीने आणि 14.34 च्या इकॉनॉमीने 32 विकेट घेतल्या होत्या. या काळात त्याची सर्वोत्तम कामगिरी 5/27 अशी होती. त्याने 1 वेळा 5 आणि 1 वेळा 4 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या.


ड्वेन ब्राव्हो


ड्वेन ब्राव्होने आयपीएल 2013 च्या हंगामात 18 सामन्यांमध्ये 15.53 च्या सरासरीने आणि 7.95 च्या इकॉनॉमीने 32 विकेट घेतल्या होत्या. त्याने यावर्षी 62.3 षटके टाकली. 42 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. ब्राव्होने 2013 मध्ये एकदा 4 विकेट्स घेतल्या होत्या.


कागिसो रबाडा


आयपीएल 21 मध्ये रबाडाने 17 सामन्यात 30 विकेट घेतल्या होत्या. या मोसमात त्याने 8.34 च्या  इकॉनॉमीने आणि 18.26 च्या सरासरीने गोलंदाजी केली. 24 धावांत 4 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. रबाडाने या मोसमात दोनदा 4 विकेट्स घेतल्या.


लसिथ मलिंगा


लसिथ मलिंगाने आईपीएल 2011 च्या हंगामात 16 सामन्यात 13.39 च्या सरासरीने आणि 5.95 च्या इकॉनॉमीने 28 विकेट घेतल्या होत्या. 13 धावांत 5 बाद ही मलिंगाची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. मलिंगाने या मोसमात 63 षटके टाकली आणि 375 धावा दिल्या होत्या


जेम्स फॉकनर


आयपीएल 2013 मध्ये फॉकनरने 16 सामन्यांमध्ये 15.25 च्या सरासरीने आणि 6.75 च्या इकॉनॉमीने 28 विकेट घेतल्या. 16 धावांत 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. त्याने यावर्षी 63.1 षटके टाकली आणि 427 धावा दिल्या होत्या.