CSK vs MI, Pitch Report : आयपीएलच्या (IPL 2022) इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असूनही यंदा अत्यंत खराब कामगिरी करणाऱ्या मुंबई आणि चेन्नई संघात आज सामना रंगणार आहे. दोघांनी आतापर्यंत बरेच सामने गमावल्याने दोघांचेही आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. पण तरी दोघांच्यातील लढत चुरशीची होण्याची शक्यता असल्याने क्रिकेट प्रेमींचे लक्ष्य या सामन्याकडे आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईने 11 पैकी केवळ 4 सामने जिंकत 8 गुणांसह नववं स्थान मिळवलं आहे. तर मुंबई 11 पैकी 9 सामन्यात पराभूत होत दहाव्या स्थानावर आहे.
आजवरच्या इतिहासाचा विचार करता आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI) हे संघ तब्बल 33 वेळा एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरले आहेत. या सर्व सामन्यांचा विचार करता मुंबईचंच पारडं जड राहिलं आहे. मुंबईने 19 सामन्यात विजय मिळवला आहे. तर चेन्नईने 14 सामने जिंकण्यात यश मिळवलं आहे.
चेन्नई विरुद्ध मुंबई अशी असेल ड्रीम 11 (CSK vs MI Best Dream 11)
विकेटकीपर- ईशान किशन
फलंदाज- ऋतुराज गायकवाड, रॉबिन उथप्पा, तिलक वर्मा, शिवम दुबे
ऑलराउंडर- केईरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, टीम डेव्हिड, मोईन अली
गोलंदाज- कार्तिकेय सिंह, डॅनियल सॅम्स
कसा आहे पिच रिपोर्ट?
आजचा चेन्नई सुपरकिंग्स (CSK) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर होणार आहे. इतर मैदानांच्या तुलनेत वानखेडेची सीमारेषा काहीशी छोटी असल्याने चौकार-षटकारांची बरसात याठिकाणी होते. त्यामुळे मोठी धावसंख्या उभा राहण्याची शक्यता आहे. दरम्यान आजचा सामना सायंकाळी असल्यान दुसऱ्या डावात दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजीचा निर्णय़ घेऊ शकतो.
हे देखील वाचा-
- Most wickets in IPL: आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एकमेव भारतीय
- Ravichandran Ashwin : दिल्लीविरुद्ध आश्विनची बॅट तळपली अन् सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस, राजस्थानचा पंतलाही टोला
- Virat Kohli : ज्या-ज्या वेळी शून्यावर बाद त्या-त्या वेळी विराट हसत मैदानाबाहेर,कोहलीच्या या 'हास्या'मागे खरं कारण काय?