CSK vs LSG , 1st Inning Highlights IPL 2024 :  ऋतुराज गायकवाडची (Ruturaj Gaikwad) शतकी खेळी आणि शिवम दुबेच्या दमदार अर्धशतकाच्या चेन्नईने (CSK) जोरावर घरच्या मैदानावर 20 षटकात 210 धावा केल्या. लखनौने (LSG) नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या चेन्नईने पहिली विकेट स्वस्तात गमावली. अजिंक्य रहाणे पहिल्याच षटकात अवघ्या चार धावांवर बाद झाला. त्यानंतर ऋतुराजने एक बाजू सावरून धरत दमदार शतकी खेळी केली. ऋतुराजने 60 चेंडून 108 धावा केल्या, तर शिवम दुबेने 27 चेंडूत 66 धावा केल्या. यामुळे लखनौ संघासमोर आता 211 धावांचं आव्हान आहे.  


लखनौला 211 धावांचा आव्हान


चेन्नई सुपर किंग्जने लखनौ सुपर जायंट्सला विजयासाठी 211 धावांचे लक्ष्य दिले आहे. चेन्नईने 20 षटकांत 4 गडी गमावून 210 धावा केल्या. यादरम्यान ऋतुराज गायकवाडने नाबाद शतक झळकावलं. ऋतुराज गायकवाडने 60 चेंडूत 108 धावा केल्या, यामध्ये 12 चौकार आणि 3 षटकार मारले. शिवम दुबेने 27 चेंडूत 66 धावा केल्या, त्याने 3 चौकार आणि 7 षटकार मारले. महेंद्र सिंह धोनीने शेवटच्या चेंडूवर चौकार मारला.






चेन्नईचे फलंदाज लखनौच्या गोलंदाजांवर भारी


धोनी चार धावा करुन नाबाद राहिला. अजिंक्य रहाणे 1 धावा करून बाद झाला आणि मिशेल 11 धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजा 16 धावांवर बाद झाला. लखनौकडून मॅट हेन्री, मोहसीन खान आणि यश ठाकूर यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली. मोहसीन 4 षटकात सर्वाधिक 50 धावा दिल्या. स्टॉइनिसने 4 षटकात 49 धावा दिल्या.


चेन्नईची निराशाजनक सुरुवात


ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांच्या 104 धावांच्या भागीदारीमुळे चेन्नई सुपर किंग्जला 210 धावांपर्यंत मजल मारता आली. महत्त्वाचं म्हणजे चेन्नई सुपर किंग्ससाठी (CSK) सामन्याची सुरुवाती काहीशी निराशाजनक झाली कारण अजिंक्य रहाणे फक्त एक धावा काढून पहिल्याच षटकात बाद झाला, तर डॅरिल मिशेलही केवळ 11 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. 50 धावांत चेन्नईने दोन विकेट गमावल्या होत्या. अशा स्थितीत रवींद्र जडेजानेही 19 चेंडूत 16 धावांचे योगदान दिले. यावेळी ऋतुराज गायकवाडने एक बाजू धरून ठेवली, त्यात त्याला शिवम दुबेची साथ मिळाली आणि संघाला 210 धावा करता आल्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Shubman Gill : शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचा ब्रेकअप? स्पॅनिश गर्लफ्रेंड मारीयाचे फोटो व्हायरल