IPL 2024 Hardik Pandya Video RR VS MI:  मुंबई इंडियन्सविरुद्ध काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने एकहाती विजय मिळवला. यशस्वी जैस्वाल आणि संदीप शर्माच्या दमदार कामगिरीच्या जोरावर राजस्थानला सहज विजय मिळवता आला. संदीप शर्माने 5 विकेट्स घेतल्या, तर यशस्वी जैस्वालने 104 धावांची खेळी केली. 


मुंबई आणि राजस्थानचा सामना सुरु असताना अचानक पावसाचे आगमन झाले. काहीवेळ सामना थांबवायला लागला. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा सामना सुरू झाला तेव्हा मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना अधिकच फटका बसू लागला. मुंबईसाठी एकमेव विकेट पियुष चावलाने घेतली, ज्याने 4 षटकांत 33 धावा दिल्या. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात 29 वर्षीय श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज नुवान तुषाराने (Nuwan Thushara) जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या 38व्या सामन्यात आयपीएलमध्ये पदार्पण केले. जसप्रीत बुमराहने त्याला कॅप दिली. लसिथ मलिंगसारखी ॲक्शन असलेल्या नुवानने 3 षटकांत 28 धावा दिल्या. यादरम्यान तुषाराचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुषारा कर्णधार हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) नाराज असल्याचं दिसत आहे. 


व्हिडीओमध्ये नेमकं काय? (Hardik Pandya Video Mumbai Indians)


व्हायरल होणारा व्हिडीओ सहाव्या षटकांमधील आहे. तुषाराच्या षटकांतील शेवटच्या चेंडूवर यशस्वी जैस्वालने मिडऑफच्या दिशेने कव्हर ड्राइव्ह मारला. चेंडू सहज रोखता आला असता, पण तो चेंडू हार्दिक पांड्याच्या हाता खालून गेला. हार्दिकला चेंडू रोखण्यात अपयश आले. पदार्पण करणाऱ्या तुषाराला हार्दिकचं हे क्षेत्ररक्षण फारसं आवडलं नाही. तुषाराने हर्दिककडे दोनदा रागाने पाहिल्याचेही व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. मात्र हार्दिक कर्णधार असल्याचे तुषाराने राग नियंत्रित केल्याचे दिसत आहे. 






'मला अजिबात आवडत नाही...' (Hardik Pandya)


सामन्याचा सुरुवातीलाच आम्ही स्वत:ला अडचणीत आणले. तिलक वर्मा आणि नेहाल वढेरा यांनी चांगली फलंदाजी केली. शेवटच्या षटकांत आम्ही चांगली फलंदाजी केली नाही. त्यामुळे 10 ते 15 धावा कमी पडल्या. गोलंदाजी करताना आम्हाला स्टम्पवर मारा करायला हवा होता. पॉवरप्लेमध्ये देखील आम्ही खूप धावा दिल्या. आज क्षेत्ररक्षणातही आमचा दिवस नव्हता. प्रत्येकाला त्यांची जबाबदारी माहिती आहे, त्यामुळे या चुका सुधारायला हव्या आणि त्या पुन्हा होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. मला संघात सतत बदल करणे अजिबात आवडत नाही, मला खेळाडूंच्या पाठीशी राहायला आवडते. चांगलं क्रिकेट खेळणे हेच आमचे लक्ष्य आहे, असं हार्दिक पांड्याने सांगितले. हे सर्व बोलताना हार्दिक पांड्याच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य काही कमी झाले नाही. 


संबंधित बातम्या:


Sandeep Sharma: लिलावात अनसोल्ड, रिप्लेसमेंट म्हणून संघात दाखल; 50 लाखांमध्ये खरेदी केलेला संदीप शर्मा भावूक


राजस्थान अव्वल स्थानी कायम, मुंबई सातव्या क्रमांकावर; जाणून घ्या, आयपीएलचे Latest Points Table