CSK vs LSG IPL 2024 MS Dhoni Batting: लखनौ सुपर जायंट्सने (LSG) चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) 8 गडी राखून पराभव केला. लखनौने सामना जिंकला असला तरी भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार आणि चेन्नईचा फलंदाज एमएस धोनीने (MS Dhoni) उपस्थितांची मनं जिंकली. लखनौ आणि चेन्नईचा हा सामना लखनौमधील एकाने मैदानात होता. मात्र या मैदानात लखनौपेक्षा चेन्नईच्या चाहत्यांनी उपस्थिती लावली होती. सर्वत्र पिवळ्या टी-शर्ट परिधान केलेले चाहते दिसून येत होते. यातच धोनी फलंदाजीसाठी आल्याने मैदानात आलेल्या प्रेक्षकांचे पैसे वसूल झाले.
लखनौविरुद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनी फलंदाजीसाठी ड्रेसिंग रूममधून बाहेर येताच संपूर्ण मैदान त्याच्या नावाच्या जल्लोषाने गाजले. मैदानात इतका धोनीच्या नावाच्या घोषणा होत्या की स्मार्ट वॉचवरही अलर्टचे मेसेज येऊ लागले होते. लखनौ संघाला यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकच्या पत्नीने देखील तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. यामध्ये तिने आपल्या स्मार्ट वॉचवर मिळालेल्या अलर्टचा फोटो शेअर केला आहे. या अलर्ट मेसेजमध्ये असे लिहिले होते की, एवढा गोंगाट आहे की जर कोणी येथे 10 मिनिटे सतत थांबले तर तो बहिरे होऊ शकतो. अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या अलर्ट मेसेजमध्ये 95 डेसिबल आवाज मोजण्यात आला.
धोनीची स्फोटक फलंदाजी-
लखनौविरुद्धच्या या सामन्यात त्याने केवळ 9 चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये त्याने 311 च्या स्ट्राइक रेटने 28 धावा केल्या. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 2 षटकारही मारले. धोनीच्या या वेगवान खेळीमुळे लखनौचा संघ निर्धारित 20 षटकांच्या सामन्यात 176 धावा करू शकला. धोनीशिवाय रवींद्र जडेजाने सीएसकेकडून नाबाद 57 धावांची खेळी केली.
केएल राहुलचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय-
सामना संपल्यानंतर लखनौ आणि चेन्नईचे खेळाडूंनी हस्तांदोलन केले. यावेळी लखनौचा कर्णधार केएल राहुल आणि चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड यांची आधी भेट झाली. ऋतुराजच्या मागून एमएस धोनी येताच केएल राहुलने त्याच्या सन्मानार्थ लगेच आपली कॅप (टोपी) काढली आणि मग हस्तांदोलन केले. केएलने ज्येष्ठ खेळाडूचा अशा प्रकारे सन्मान केल्याने चाहते भारावून गेले आहेत. त्याचा हा हावभाव क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.
संबंधित बातम्या:
कॅच ऑफ द टूर्नामेंट..., बिबट्यासारखी झेप घेत जडेजाने टिपला झेल; ऋतुराज, राहुलसह सगळे अवाक्, Video
MS Dhoni समोर येताच केएल राहुलने काय केलं?; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय, चाहतेही भारावून गेले!
IPL 2024: रस्सीखेच सुरु झाली...चार संघाचे 8, तर 3 संघाचे 6 गुण; पाहा आयपीएलचे Latest Points Table