CSK vs KKR : आयपीएलच्या 15 व्या पर्वाला सुरुवात आजपासून होणार आहे. पहिला सामना आज 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात पहिला सामना खेळवला जाणार आहे. सामन्याच्या जवळपास 48 तास म्हणजेच दोन दिवस आधी धोनीने संघाचं कर्णधारपद सोडलं. जाडेजाकडे हे पद सोपवण्यात आलं असून आज जाडेजा कर्णधार म्हणून मैदानात उतरेल. दुसरीकडे कोलकात्याचं कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे असणार आहे. दोन्ही नवे कर्णधार आपआपल्या संघाना घेऊन सलामीच्या सामन्यात विजय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. सीजनच्या पहिल्या सामन्यात काही खास रेकॉर्ड चेन्नईचे खेळाडू बनवू शकतात त्यावर एक नजर फिरवूया...


1. महेंद्र सिंह धोनी आयपीएलमध्ये आजवर 220 सामने खेळले असून त्यात 4 हजार 746 रन त्याने केले आहेत. धोनीने टीम इंडियाकडून 98 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून त्यात त्याने 1 हजार 617 रन केले आहेत. तर झारखंड स्टेट टीमकडूनही त्याने काही टी20 सामने खेळले आहेत.  महेंद्र सिंह धोनीने आजवर 347 टी20 सामने खेळत त्यात 6935 रन बनवले आहेत. त्यामुळे धोनीने आज कोलकात्याविरुद्ध 65 रन केल्यास तो टी20 क्रिकेटमध्ये 7000 हजार रन पूर्ण करेल.


2. चेन्नई सुपर किंग्सचा दुसरा स्टार खेळाडू ड्वेन ब्राव्होकडेही इतिहास रचण्याची संधी आहे. आयपीएलमध्ये त्याने 151 सामने खेळत 167 विकेट्स मिळवले आहेत. जर ब्राव्होने आज कोलकात्याविरुद्ध 4 विकेट्स घेतले तर तो आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू बनेल. आयपीएलमध्ये 170 विकेट्स लसिथ मलिंगाच्या नावावर आहेत. पण तो आता निवृत्त झाला असून त्यामुळे ब्राव्हो आज 4 विकेट्स घेतल्यास सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू होईल.


3. कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार स्पिनर सुनील नारायण याच्याकडेही आयपीएलमध्ये एक खास रेकॉर्ड करण्याची संधी आहे. सुनील नारायणने आजवर आयपीएलमध्ये 143 विकेट्स घेतले आहेत. आज तो 7 विकेट्स घेण्यात यशस्वी झाला तर त्याच्याही आयपीएलमध्ये 150 विकेट्स पूर्ण होती. यासह तो लसिथ मलिंगा (170), ड्वेन ब्राव्हो (167), अमित मिश्रा (166), पीयूष चावला (157) आणि हरभजन सिंह (150) या स्टार खेळाडूंच्या यादीत सामिल होईल.


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha