IPL 2023 Final, CSK vs GT : आयपीएल 2023 च्या (IPL 2023) अंतिम सामन्याचा थरार आज चार वेळा चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गतविजेच्या गुजरात टायटन्स (Gujarat Titans) या दोन संघात पाहायला मिळणार आहे. सुमारे दोन महिन्यानंतर आज यंदाच्या हंगामातील अंतिम फेरी (IPL Final Match) पार पडणार आहे. गुजरातच्या (GT) होमग्राऊंडवर हा सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) आज संध्याकाळी 7.30 वाजता हे दोन्ही संघ आमने-सामने उतरतील. दरम्यान, आजच्या सामन्यावेळी पावसाचा पडण्याची शक्यता आहे का आणि आज अहमदाबादमधील हवामानाचा अंदाज काय असेल ते सविस्तर जाणून घ्या.
नरेंद्र मोदी स्टेडियम अंतिम सामन्यासाठी सज्ज
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्यासाठी सज्ज आहे. क्वालिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय मिळवून चेन्नई सुपर किंग्सने अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएलच्या इतिहासात 10 व्यांदा अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला. आजच्या अंतिम सामन्याकडे सर्वे क्रिकेट प्रेमींचं लक्ष्य लागलं आहे.
चेन्नईचा गुजरातशी महामुकाबला
आज इंडियन प्रीमियर लीगच्या सोळाव्या हंगामातील अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे. दरम्यान, 28 मे रोजी खेळवल्या जाणाऱ्या सामन्यावर पावसाचं सावट आहे. आज अहमदाबादमधील सामन्यावेळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रविवारी दिवसा अहमदाबादमध्ये 40 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज आहे. तर, रात्री तापमान 28 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. आज अहमदाबादमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असल्याने चाहते चेन्नई विरुद्ध गुजरात सामन्याचा पुरेपुर आनंद घेऊ शकेल का हे पाहावं लागेल.
आयपीएल 2023 च्या अंतिम सामन्याचा थरार
आयपीएल 2023 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गतविजेत्या गुजरात टायटन्सचा पराभव केला. गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाला अंतिम सामन्यात चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान असेल. चेन्नईचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा अनुभव आणि गुजरात टायटन्सचा ऑलराऊंडर कर्णधार हार्दिक पांड्या यांच्यात महामुकाबला रंगणार आहे.
IPL 2023 : सामन्याचं थेट प्रक्षेपण येथे पाहा...
आयपीएलच्या 2023 अंतिम सामन्याच थेट प्रक्षेपण (Live Streaming) तुम्हांला पाहता येणार आहे. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला लाईव्ह स्ट्रिमिंगवर पाहता येईल, जिओ सिनेमा ॲपवर तुम्ही हा महामुकाबला लाईव्ह पाहू शकता.