CSK vs DC Match Prediction : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 55 व्या सामन्यात आज चेन्नई आणि दिल्ली (DC vs CSK) संघ आमने-सामने येणार आहेत. चेन्नईच्या घरच्या चैपॉक मैदानावर (Chepauk Stadium) 10 मे रोजी संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ मागील सामन्यात विजय मिळवल्यानंतर आज मैदानात उतरतील. दोन्ही संघ विजयी मार्गावर कायम राहण्याचा प्रयत्न करतील. प्लेऑफमध्ये स्थान कायम राखण्यासाठी चेन्नई (Chennai Super Kings) संघांसाठी आजचा सामना जिंकणं महत्त्वाचं आहे. तर दिल्ली (Delhi Capitals) संघांची मागील काही सामन्यांतील कामगिरी पाहता दिल्ली कॅपिटल्स आजचा सामना जिंकून बाजी पलटण्याचा प्रयत्न करेल.


CSK vs DC, IPL 2023 : कुणाचं पारड जड?


यंदाच्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामात चेन्नईला पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, नंतर चेन्नईनं दमदार कमबॅक केलं आणि आता संघ प्लेऑफच्या शर्यतीत पोहोचला आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स संघाला यंदाच्या हंगामात काही खास कामगिरी करता आलेली नाही. सुरुवातीपासूनच संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुणतालिकेत चेन्नई संघ 13 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्सने 11 पैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर चार सामने गमावले आणि एक सामना अनिर्णित राहिला. दिल्ली कॅपिट्ल्स दहाव्या स्थानावर आहे. दिल्ली संघाने त्यांच्या 10 पैकी चार सामन्यांत विजय मिळवला तर सहा सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. संघांकडे आठ गुण आहेत.


CSK vs DC Head to Head : मुंबई विरुद्ध बंगळुरु, हेड टू हेड आकडेवारी


इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) संघ एकूण 27 सामन्यांमध्ये आमनेसामने आले आहेत. यामध्ये चेन्नई संघाचं पारड जड आहे. चेन्नईने 17 सामने जिंकले आहेत, तर दिल्ली संघाला फक्त 10 सामने जिंकता आले आहेत.


IPL 2023 : कधी आणि कुठे होणार सामना?


चेन्नई (CSK) आणि दिल्ली (DC) यांच्यात आज 10 मे रोजी सामना रंगणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडिअमवर (M. A. Chidambaram Stadium) म्हणजेच चेपॉक मैदानावर (Chepauk Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता नाणेफेक होईल.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


IPL 2023 Points Table : दमदार विजयासह मुंबईची प्लेऑफच्या शर्यतीत एंट्री, बंगळुरुसह राजस्थानलाही धक्का; गुणतालिकेतील संघांची स्थिती पाहा