IPL 2023 Points Table : आयपीएल (2023) (IPL 2023) मध्ये 54 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (MI) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) सहा विकेट्सनी पराभव करत यंदाच्या मोसमातील सहावा विजय मिळवला. या विजयासह मुंबईचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत स्थान मिळवलं आहे. तर मुंबईकडील पराभवानंतर बंगळुरुचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याच मार्ग कठीण झाला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आरसीबीने पहिल्यांदा फलंदाजी करताना 199 धावा केल्या. मुंबईने 16.3 षटकांत सहा गडी राखून हा सामना जिंकला. या विजयासह मुंबई संघ गुणतालिकेत आठव्या वरून थेट तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर आरसीबी सहाव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर घसरला आहे.
मुंबईची प्लेऑफच्या शर्यतीत एंट्री
मुंबईच्या विजयानंतर प्लेऑफची शर्यत रंजक झाली आहे. दरम्यान, प्लेऑफच्या शर्यतीत गुजरात सर्वात पुढे आहे. गुजरात टायटन्स संघ 16 गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. गुजरातने 11 पैकी आठ सामने जिंकले आहेत. त्यानंतर चेन्नई संघ 13 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. चेन्नई सुपर किंग्सने 11 पैकी सहा सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर चार सामने गमावले आणि एक सामना अनिर्णित राहिला. आरसीबीचा पराभव करत मुंबईनं तिसरं स्थान काबीज केलं आहे. मुंबईने 11 पैकी सहा सामने जिंकले असून संघाकडे 12 गुण आहेत. मुंबईच्या विजयाटा लखनौ आणि राजस्थानला धक्का बसला आहे. दोन्ही संघ एक-एक स्थान खाली घसरले आहेत. लखनौ आता 11 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर राजस्थान पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
इतर संघांची स्थिती काय?
राजस्थान (RR), कोलकाता (KKR), बंगळुरु (RCB) आणि पंजाब (PBKS) संघाकडे प्रत्येकी 10 गुण आहेत. पण, नेट रनरेटमुळे संघांच्या क्रमवारीत बदल झाला आहे. राजस्थान रॉयल्स पाचव्या क्रमांकावर आहे. तर, कोलकाता सहाव्या क्रमांकावर आहे. कोलकाता आणि राजस्थान दोन्ही संघांनी त्यांचे 11 पैकी पाच सामने जिंकले आणि सहा सामने गमावले आहेत. मुंबई कडून पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ पाच क्रमांकावरून थेट सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
आयपीएल गुणतालिकेत पंजाब किंग्स आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पंजाब संघाने आतापर्यंत 11 पैकी पाच सामने जिंकले तर सहा सामने गमावले आहेत. त्यानंतर सनरायजर्स हैदराबाद संघ सध्या नवव्या तर दिल्ली कॅपिट्ल्स दहाव्या स्थानावर आहे. हैदराबाद आणि दिल्ली दोन्ही संघानी त्यांच्या 10 पैकी चार सामन्यांत विजय मिळवला तर सहा सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. दोन्ही संघांकडे आठ गुण आहेत.