CSK Team Instagram : चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघ व्यवस्थापन आणि संघाचा स्टार खेळाडू रवींद्र जाडेजा या दोघांमध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. त्यातच आता चेन्नई सुपरकिंग्स संघाच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरुन रवींद्र जाडेजाला अनफॉलो करण्यात आल्याने आता आणखीच चर्चा होत आहेत. नुकताच बरगडीच्या दुखापतीमुळे आयपीएल 2022 च्या उर्वरीत हंगामातून बाहेर गेलेल्या जाडेजाला आता संघाने इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याने जाडेजा आणि सीएसकेमध्ये गंभीर वाद असल्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.


दरम्यान संघाचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना याबाब महत्त्वाची माहिती दिली,“जाडेजा सीएसके संघात कायम राहणार आहे. मी अधिक सोशल मीडिया वापरत नसल्याने मला याबाबत अधिक माहिती नाही. मी इतकचं सांगेन की संघ व्यवस्थापन आणि जाडेजामध्ये कोणताच वाद नसून सोशल मीडियावर काय सुरु आहे, याबाबत मला अधिक मागित नाही. पण भविष्याच जाडेजा नक्कीच सीएसके संघातच असेल.”


बंगळुरूविरुद्ध सामन्यात रवींद्र जाडेजाला दुखापत


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सामन्यात क्षेत्ररक्षण करताना रवींद्र जडेजाला दुखापत झाली. एवढेच नव्हेतर दुखापतीमुळं त्याला दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं होतं. यादरम्यान, रवींद्र जडेजाला आयपीएल 2022 मधून बाहेर पडावं लागू शकते, अशी बातम्यांनी वेग धरला होता. त्यानंतर आता अधिकृतपणे चेन्नई सुपरकिंग्सनेही याबाबत माहिती दिली आहे.


IPL 2022 मध्ये जाडेजाचं खराब प्रदर्शन


आयपीएल सुरू होण्यापूर्वी महेंद्रसिंह धोनीनं रवींद्र जाडेजाकडं चेन्नईच्या संघाचं कर्णधारपद सोपवलं होतं. परंतु, रवींद्र जाडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. रवींद्र जाडेजानं आठ सामन्यात चेन्नईच्या संघाचं नेतृत्व केलंय. यापैकी सहा सामन्यात चेन्नईला पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर रवींद्र जाडेजानं पु्न्हा कर्णधाराची जबाबदारी धोनीकडं सोपवली.


हे देखील वाचा-