MPL 2023 : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महाराष्ट्र प्रिमियर लीग  स्पर्धेला 15 जूनपासून शुभारंभ होत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात लिलाव प्रक्रिया पार पडली.  पुणे, सोलापूरसह सहा संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.  आज एमपीएलचे वेळापत्रक जारी करण्यात आलेय. प्रत्येक संघाचे पाच सामने होणार आहेत. 15 जूनपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेचा 29 जून रोजी समारोप होणार आहे. हे सर्व सामने पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअम, गहुंजे येथे खेळले जातील. एमपीएल स्पर्धेत एकूण 19 सामने खेळले जाणार आहेत. त्यातील 15 साखळी सामने, तर उर्वरित 4 प्ले-ऑफचे सामने असतील. या स्पर्धेत प्रत्येक संघ प्रत्येकी 5 सामने खेळणार आहे. याव्यतिरिक्त स्पर्धेत महिला क्रिकेटचे तीन प्रदर्शनीय सामनेही खेळवले जाणार आहेत.

15 जून 2023 पासून महाराष्ट्र प्रिमिअर लीगला सुरुवात होणार आहे. पुणेरी बप्पा आणि कोल्हापूर टस्कर्स यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. त्याआधी तासभर ओपनिंग सरेमनिचा कार्यक्रम रंगणार आहे. अमृता खानविलकर हिच्यासह अन्य कलाकार परफॉर्म करणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट मंडळाकडून आज वेळापत्रक जारी करण्यात आलेय. सहा संघामध्ये 15 साखळी सामने होणार आहेत. त्यानंतरल आघाडीच्या दोन संघामध्ये क्वालिफायरचा सामना होईल.. तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावरील संघ एलिमनेटर सामना खेळेल. क्वालिफायर एक मधील विजेता संघ थेट फायनलमध्ये जाईल.. तर पराभूत संघाला आणखी एक संधी मिळणार आहे.. क्विलाफियर 1 मध्ये पराभूत झालेला संघ क्वालिफायर 2 मध्ये खेळेल. एलिमेटर मध्ये पराभूत होणाऱ्या संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. तर विजेता संघ क्विलाफायर 2 मध्ये प्रवेश करेल. .. 29 जून रोजी फायनलचा थरार रंगणार आहे.

15 जून 2023 - 

7PM - पुणेरी बप्पा vs कोल्हापूर टस्कर्स 

16 जून 2023 -

10 AM - इगल नाशिक टायटन्स vs छत्रपती संभाजी किंग्स

3.30PM - रत्नागिरी जेट्स vs सोलापूर रॉयल्स

17  जून 2023 -

7PM -  कोल्हापूर टस्कर्स vs रत्नागिरी जेट्स 

18 जून 2023 - 

10 AM - इगल नाशिक टायट्नस vs सोलापूर रॉयल्स

3.30PM - पुणेरी बप्पा vs छत्रपती संभाजी किंग्स 

19 जून 2023

7PM - पुणेरी बप्पा vs इगल नाशिक टायट्नस 

20 जून 2023 -

10 AM - सोलापूर रॉयल्स  vs कोल्हापूर टस्कर्स

3.30 - रत्नागिरी जेट्स vs छत्रपती संभाजी किंग्स

21 जून 2023 -  

7PM - इगल नाशिक टायट्नस vs रत्नागिरी जेट्स 

22 जून 2023 - 

10 AM -  छत्रपती संभाजी किंग्स vs कोल्हापूर टस्कर्स 

3.30 - पुणेरी बप्पा vs सोलापूर रॉयल्स 

23 जून 2023 - 

7pm - सोलापूर रॉयल्स vs छत्रपती संभाजी किंग्स

24 जून 2023 

10 AM - पुणेरी बप्पा vs रत्नागिरी जेट्स

3.30 - कोल्हापूर टस्कर्स vs इगल नाशिक टायट्नस

25 जून 2023 - क्वालिफायर 1

26 जून 2023 - एलिमेनर

27 जून 2023 - क्वालिफायर 2

29 जून 2023 - फायनल 

26, 27 आणि 28 जून रोजी महिलांचे तीन प्रदर्शनीय सामनेही खेळवले जाणार आहेत. प्रत्येक सामना त्या-त्या दिवशी सकाळी 10 वाजता खेळला जाईल.