Cricket South Africa: दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा प्रशिक्षक मार्क बाउचरची (Mark Boucher) वर्णद्वेषाच्या आरोपांतून मुक्ता करण्यात आली आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांच्यावरील वर्णद्वेषासह अनेक आरोप मागे घेण्यात आले आहेत. डिसेंबर 2021 मध्ये इंडिपेंडेंट सोशल जस्टिस अँड नेशन-बिल्डिंग (SJN) डुमिसा न्त्सेबेजा कडून अहवाल प्राप्त झाला होता, ज्याने बाऊचरवर अनेक आरोप केले होते. यानंतर त्यांनी या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.विशेष म्हणजे, दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथची काही दिवसांपूर्वीच वर्णद्वेषाच्या आरोपांतून निर्दोष मुक्तता करण्यात होती.



सीएसएच्या अहवालानुसार,अॅडम्स आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी सहाय्यक प्रशिक्षक एनोक अंकवे यांनी पुढील आठवड्याच्या सुनावणीला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्व आरोप निराधार असल्याचं दिसून आलं. बाउचर यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, "माझ्यावर लावण्यात आलेले वर्णद्वेषाचे आरोप अनुचित आहेत आणि यामुळे मला खूप दुख झाले आहे. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबियासाठी गेले काही महिने खूप कठीण ठरले आहेत. परंतु, आता मला आनंद होत आहे की, मी या सर्व गोष्टींवर पूर्णविराम लागला आहे. माझ्यावर लावलेले सर्व आरोप निराधार असल्याचं सीएसएनं मान्य केले". 


मार्क बाऊचर हा क्रिकेट विश्वातील सर्वात दिग्गज यष्टिरक्षक म्हणून ओळखला जातो. दरम्यान, 2012 साली इंग्लंड दौऱ्यावर यष्टीरक्षण करताना डोळ्यावर बेल्स लागल्यानं त्याची कारकीर्द आकस्मिकपणे संपुष्टात आली. बाऊचर 2019 पासून दक्षिण आफ्रिकेचा मुख्य प्रशिक्षक आहे. सीएसएनं दिलेल्या अहवालानंतर मार्क बाउचरला मोठा दिलासा मिळाला आहे.


हे देखील वाचा-