Charlotte Edwards Steps Down As Mumbai Indians Women Head Coach : इंडियन प्रीमियर लीगचा रोमांचक प्रवास शिगेला पोहोचला आहे. जिथे एकामागून एक मनोरंजक सामने खेळले जात आहेत. दरम्यान, मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक आपला संघ सोडून दुसऱ्या संघात सामील झाले आहेत. खंरतर, मुंबई इंडियन्स महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाबद्दल बोलत आहोत. ज्यांनी सोमवारी इंग्लंड महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली.

Continues below advertisement


इंग्लंड महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी चार्लोट एडवर्ड्स यांची नियुक्ती


चार्लोट एडवर्ड्स 2025 च्या महिला प्रीमियर लीग चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसल्या होत्या. मुंबई इंडियन्सला चॅम्पियन बनवणारे मुख्य प्रशिक्षक आता इंग्लंड महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक बनल्या आहेत. 




मुंबई इंडियन्सकडून चार्लोट एडवर्ड्सला शुभेच्छा


मुंबई इंडियन्स महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदावरून शार्लोट एडवर्ड्स निघून गेल्याबद्दल फ्रँचायझीने एक निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये म्हटले की,"शार्लोटने संघाला अविश्वसनीय कामगिरीकडे नेले आहे, तीन वर्षांत दोन विजेतेपदे जिंकली आहेत, तिने मुलींना सर्वोत्तम क्रिकेट खेळण्यासाठी प्रेरणा दिली आहे आणि एमआयचा वारसा पुढे नेला आहे."


यासोबतच, मुंबई इंडियन्स फ्रँचायझीनेही त्यांचे आभार मानले आहेत. जिथे चार्लोटने महिला प्रीमियर लीगमध्ये या संघासोबत पहिले 3 हंगाम काम केले. मुंबई इंडियन्सने पुढे लिहिले की, "आम्ही तिला शुभेच्छा देतो आणि गेल्या तीन वर्षांत तिने आमच्या संघासाठी जे काही केले आहे त्याबद्दल आम्ही तिचे आभारी आहोत."




इंग्लंड महिला क्रिकेट संघाची 45 वर्षीय खेळाडू चार्लोट एडवर्ड्सला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दीर्घ अनुभव आहे. ती इंग्लिश संघासाठी तिन्ही फॉरमॅट खेळली आहे. ज्यामध्ये तिने 23 कसोटी, 191 एकदिवसीय आणि 95 महिला आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. ती बराच काळ इंग्लंडची कर्णधारही होती. आता इंग्लंड महिला क्रिकेट संघाला तिच्या अनुभवाचा फायदा होईल.


हे ही वाचा -


Tilak Varma : तिलक वर्माने मुंबई इंडियन्सशी संबंध तोडले? हार्दिक पांड्याच्या 'त्या' कृत्यानंतर उचललं मोठं पाऊल