मुंबई : आयपीएल 2020 आजपासून सुरू होणार आहे. कोरोना काळातील निराशेने भरलेल्या या वातावरणात आयपीएलने एक आशा आणली आहे. तसेच देशभरातील क्रिकेट रसिकांसाठी खेळाचा आनंद तर जुगार खेळणाऱ्यांसाठी बेटिंगमार्फत पैसे कमवण्याची संधी आयपीएल देणार असल्याचे जाणकार म्हणत आहे.
एकीकडे क्रिकेटप्रेमी आपल्या आवडत्या खेळाचा आनंद लुटतील, तर कोरोना काळातील मंदीच्या काळातली सट्टेबाजीचे जगही पुन्हा जिवंत होईल. मुंबईच्या बुकीजचा दावा आहे की यंदा आयपीएल वर 500-700 कोटींचा सट्टा खेळण्याचा अंदाज आहे, तर या सीजनसाठी सट्टाबाजारच्या आकड्यांनुसार मुंबई इंडीयन ही फेव्हरेट टीम आहे. सट्टाबाजारातील सुत्रांच्या माहितीनुसार, या आयपीएल सीजनसाठी, मुंबई इंडीयन्सला सर्वाधिक पसंती असून मुंबईचा भाव 4 रुपये आहे. तर राजस्थान रॉयल्स 11 रुपयांसह तळाशी आहे.
सट्टाबाजारच्या दरानुसार
- मुंबई इंडियन्स - 4
- चेन्नई सुपरकिंग्ज - 5.4
- हैदराबाद - 5.6
- रॉयल चॅलेंजर बंगळुरू - 6.3
- दिल्ली - 7
- केकेआर (कोलकाता) - 7.2
- पंजाब - 10.2
- राजस्थान रॉयल्स - 11
बुकीच्या म्हणण्यानुसार, यावेळी सट्टाबाजारात या सीजनविषयी बरच कुतूहल आहे. यावेळी 500-700 कोटींची सट्टा खेळला जाण्याची शक्यता आहे. यावेळी सट्टेबाजांनी सट्टा खेळण्याची पद्धत ही बदलली आहे. फोन किंवा मेसेजवर सट्टा लावण्याऐवजी बुकीने ऑनलाईन सट्टा खेळण्याचीही व्यवस्था केली आहे. बुकींच्या म्हणण्यानुसार बुकींनी त्यांच्या संबंधित पंटरला आयडी दिला आहे, ज्यामुळे सट्टेबाजी करणे आणखी सोप्पे झाले आहे. प्रत्येक पंटर या आयडीद्वारे पैज लावतो. तंत्रज्ञानामुळे, सट्टेबाज आणि पैज लावणे सोपे झाले आहे.
कोरोना काळात लोकांकडे पैसे नव्हते. परंतु, आयपीएल 2020 सीजनमध्ये कोट्यावधींचा सट्टा खेळण्याची ज्या प्रकारे अपेक्षा केली जात आहे. त्यावरून असे दिसून येते की लोकांकडे कोरोना काळातही सट्टा खेळण्यासाठी प्रचंड पैसा आहे. या व्यवसायाशी संबंधित लोक असेही म्हणतात की कोरोनामुळे लोकांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता. मंदीच्या या काळात लोकांचे बरेच नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी जुगार खेळणारे आयपीएलकडे पैसे कमवण्याची संधी म्हणून पहात आहेत.
महत्वाच्या बातम्या :
IPL 2020: तीन-तीन विदेशी खेळाडूंसह मैदानात उतरु शकतात रोहित-धोनी; 'हे' आहे कारण
IPL 2020 : प्रॅक्टिस मॅचदरम्यान ऑलराउंडर हार्दिक पांड्याचे धमाकेदार शॉट्स, MI कडून व्हिडीओ शेअर
IPL 2020 | अबुधाबीत आयपीएलचा सलामीचा सामना, Mumbai Indians VS Chennai Super Kings पहिली लढत