IPL 2022 : आयपीएलचा 15 वा हंगाम उत्तरार्धाकडे चाललाय तसा स्पर्धेतील रोमांच वाढत चालला आहे. या हंगामात दिनेश कार्तिक आणि राहुल तेवातिया यांची चर्चा सुरु आहे. दोघांनीही आपापल्या संघासाठी फिनिशरची भूमिका पार पाडली. कार्तिक-तेवातियाने आपल्या फिनिशिंग स्किल्सने क्रीडा चाहत्यांना हैराण केलेय. राहुल तेवातियाने गुजरातच्या विजयात मोठी भूमिका पार पाडली आहे. तेवातियाने गुजरातला अशक्यप्राय विजय मिळवून दिलेत. दुसरीकडे आरसीबीकडून खेळणाऱ्या कार्तिकने भारतीय संघाचे दरवाजे ठोठावले आहेत. पाहूयात... दोन्ही खेळाडूची यंदाच्या हंगामात कशी कामगिरी केली आहे.. त्याजोरावर तुम्हीच ठरवा... बेस्ट फिनिशर कोण?


दिनेश कार्तिकची कामगिरी -  
यंदाच्या हंगामात दिनेश कार्तिकची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. कार्तिकने आतापर्यंत 11 सामन्यात 61 च्या सरासरीने आणि 189 च्या स्ट्राईक रेटने 244 धावा चोपल्या आहेत. यामध्ये तो तब्बल सातवेळा नाबाद राहिलाय. नाबाद 66 ही त्याची यंदाच्या हंगामातील सर्वोत्कृष्ट खेळी आहे. यंदाच्या हंगामात कार्तिकने एकूण 129 चेंडूचा सामना केला आहे. यामध्ये त्याने 17 षटकार आणि 20 चौकार लगावले आहेत. कार्तिकने 182 धावा फक्त चौकार आणि षटकारांनी चोपल्या आहेत. 


तेवातियाचा फिनिशिंग टच कसाय?
राहुल तेवातियाने यंदा आपल्या कामगिरीने सर्वांनाच हैराण केलाय. राहुल तेवातियाने गुजरातला अशक्यप्राय विजय मिळवून दिलेय. राहुल तेवातियाने 11 सामन्यात 150.78 च्या स्ट्राइक रेटने  193 धावा चोपल्या आहेत. नाबाद 43 ही राहुलची यंदाच्या हंगामातील सर्वोच्च धावसंख्या आहे. राहुल तेवातिया चारवेळा नाबाद राहिलाय. राहुल तेवातियाने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत गुजरातला अनेक रोमांचक विजय मिळवून दिलेत. आरसीबीविरोधात तेवातियाने गुजरातच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. 43 चेंडूत गुजरातला विजयासाठी 76 धावांची गरज असताना तेवातियाने 25 चेंडूत 43 धावांची नाबाद खेळी केली. यावेळी डेविड मिलरने 24 चेंडूत 39 धावांची खेळी करत चांगली साथ दिली होती.  तर हैदराबादविरोधात तेवितायाने अखेरच्या दोन चेंडूवर 12 धावांची गरज असताना दोन षटकार लगावले होते. पंजाबविरोधात राहुलने तीन चेंडूत 13 धावा चोपल्या होत्या. राहुलने तेवातियाने बेस्ट फिनिशर भूमिका पार पाडली.