SRH vs RCB : आयपीएल 2022 (IPL 2022) मधील आजचा 54 वा सामना सुरु आहे. या सामन्यात रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद (RCB vs SRH) अशी लढत पार पडत आहे. सामन्यात बंगळुरुने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा काहीसा वेगळा निर्णय घेतला. हा निर्णय़ कर्णधार फाफने फलंदाजासोबत मिळून योग्य असल्याचं ठरवत केवळ तीन विकेट्सच्या बदल्यात 192 धावांची मोठी धावसंख्या उभारली आहे. त्यामुळे आता हैदराबादला विजयासाठी 193 धावा करायच्या आहेत.



सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकत बंगळुरुने फलंदाजीचा निर्णय घेतला. सामना दुपारी असल्याने दुसऱ्या डावात दवाची अडचण येणार नाही त्यामुळे हा निर्णय घेतला. एक मोठी धावसंख्या उभारण्याची रणनीती बंगळुरुची होती. त्यात पहिल्याच चेंडूवर विराट शून्यावर बाद झाला. पण नंतर कर्णधार फाफ डु प्लेसीस आणि रजत पाटीदारने डाव सांभाळत एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न केला. दोघांनी धावसंख्या 100 च्या पुढे नेल्यानंतर विराटला बाद करणाऱ्या जे सुचितने रजतला 48 धावांवर तंबूत धाडलं. त्यानंतर मॅक्सवेल क्रिजवर आल्यानंतर त्यानेही डाव सांभळला. पण 33 धावा करुन तोही बाद झाला. कार्तिकने त्याला बाद केलं.


दिनेश कार्तिची तुफान खेळी


अखेरची दोन षटकं खेळायला आलेल्या दिनेशने तुफान फटकेबाजी सुरु केली. त्याने अवघ्या 8 चेंडूत 30 धावा कुटल्या. यात 4 षटकार आणि 1 चौकार त्याने लगावला. आज सलामीचा सामना खेळणाऱ्या एफ फारुकीला त्याने अखेरच्या षटकात 22 धावा ठोकल्या.



हे देखील वाचा-