IPL 2023 Auction : इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएल (IPL) म्हणजे जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग आहे. त्यामुळे या लीगचे सामनेच नाही तर ऑक्शनही पाहायला क्रिकेटप्रेमींना खास आवडतं...आता आगामी आयपीएल 2023 (IPl 2023) स्पर्धेसाठीचं ऑक्शन 16 डिसेंबर रोजी बंगळुरू येथे होणार असल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या अहवालातून समोर आली आहे. हा एक मिनी ऑक्शन असणार असून मागील वर्षीच्या मेगा ऑक्शनच्या तुलनेत छोटा असणार आहे. पण असं असलं तरी यंदाही काही मोठे बदल यंदाही होण्याची शक्यता आहे.


समोर आलेल्या माहितीनुसार आयपीएल 2022 च्या महालिलावावेळी संघाना 90 कोटी इतकी रक्कम देण्यात आली होती. यंदा ही रक्कम 95 कोटी असून संघ आपल्या खेळाडूंच्या ट्रेडींगनंतर ही रक्कम कमी-जास्त होऊ शकते. मागील दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे आयपीएलची स्पर्धा निर्बंधाखाली झाली होती, त्यानंतर आयपीएल 2022 प्रेक्षकांसह झाली असली तरी आता निर्बंध आणखी कमी झाल्याने यंदाचा हंगाम आणखी दमदाररित्या पार पडणार अशी दाट शक्यता आहे. यंदाही 10 संघ असणार असून नव्या दोन संघामुळे आयपीएल 2022 रंगतदार झाली ज्यानंतर यंदाही आयपीएल 2023 आणखी चुरशीची होईल हे नक्की. आयपीएल 2023 मध्ये काही मोठे बदल होऊ शकतात. चेन्नई सुपरकिंग्सचा स्टार अष्टपैलू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) हा संघ बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच इतरही काही मोठे खेळाडू संघबदल करु शकतात. त्यामुळे हा लिलाव पाहण्याजोगा असेल.


आयपीएल पुन्हा Home Away Format मध्ये


आगामी आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेसंबधित बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguy) याने काही दिवसांपूर्वीच एक नवी घोषणा केली. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतची माहिती दिली असून तो म्हणाला, ''मागील दोन वर्षे कोरोनामुळे आयपीएल नेहमीसारखी होत नव्हती, पण आता आयपीएल पुन्हा जुन्या ढंगात होणार आहे. ज्यामुळे आता प्रत्येक संघ आपले सात सामने घरच्या मैदानात तर उर्वरीत सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळणार आहे.'' टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ''पुरुषांच्या आयपीएलचा आगामी हंगाम पहिल्याप्रमाणे होम आणि अवे फॉरमॅटमध्ये होणार आहे. ज्यामुळे सर्व दहा संघ त्यांचे 7 सामने घरच्या मैदानात तर उर्वरीत 7 सामने प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानात खेळणार आहेत. तसंच सध्या बीसीसीआय बहुप्रतिक्षित महिला आयपीएलवर काम करत आहे. आम्ही पुढच्या वर्षी पहिला हंगाम सुरू करण्याची शक्यता आहे.”  


हे देखील वाचा-


T20 World Cup 2022 : बुमराहशिवाय टीम इंडियाचं कसं होणार? कशी असेल रणनीती? कसा असेल बोलिंग अटॅक?