BCCI Ban on Gurmeet Singh Bhamrah : सध्या क्रिकेट जगत आयपीएलच्या (IPL 2025) जल्लोषात बुडाले आहे. क्रिकेट जगतातील मोठे स्टार सध्या आयपीएलमध्ये खेळत आहे. बीसीसीआय (BCCI) देखील ही लीग पूर्ण यशस्वीरित्या आयोजित करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. दरम्यान, बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआय लोकपालने एका संघाच्या मालकावर आजीवन बंदी घातली आहे.

पण, ही फ्रँचायझी आयपीएलची नाही. मुंबई टी-20 लीगच्या संघ मालकाबाबत बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. या व्यक्तीचे नाव गुरमीत सिंग भामराह (Gurmeet Singh Bhamrah) आहे. बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने गुरमीतवर मॅच फिक्सिंगचा आरोप केला आहे. वृत्तसंस्था एएनआयने ही माहिती दिली आहे. 

कधीच आहे 'हे' प्रकरण  

बीसीसीआयचे लोकपाल न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी म्हटले आहे की, हे प्रकरण 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या मुंबई टी-20 लीगच्या हंगामातील उपांत्य सामन्याशी संबंधित आहे. आदेशात म्हटले आहे की, गुरमीतने सामना निश्चित करण्यासाठी खेळाडूशी संपर्क साधला होता आणि खेळाडूने संबंधित एजन्सींकडे या प्रकरणाची तक्रार केली होती. या कारणास्तव, गुरमीतवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे.

यापूर्वी, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने गुरमीतविरुद्ध चौकशी केली होती. ज्यामध्ये तो दोषी आढळला होता. यानंतर हे प्रकरण लोकपालपर्यंत पोहोचले. अरुण मिश्रा यांनी त्यांच्या निर्णयामागे अनेक कारणे सांगितली आणि गुरमीतवर आजीवन (BCCI Ban on Gurmeet Singh Bhamrah) बंदी घातली. संघ मालकाला कॅनेडियन लीगसह इतर देशांच्या क्रिकेट लीगमध्ये आर्थिक पाठबळ आहे.

अरुण मिश्रा यांनी म्हटले आहे की, मॅच फिक्सिंगविरुद्ध कठोर कारवाई केली पाहिजे आणि म्हणूनच त्यांना कठोर शिक्षा देण्यात आली आहे. 2013 मध्ये आयपीएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणानंतर, बीसीसीआयने लीगमधील अशा बाबींबाबत कठोर निर्णय घेतला आहे आणि कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा सहन करत नाही.

हे ही वाचा -

Rohit Sharma : रोहित शर्मा फक्त नाव नाही तर ब्रँड आहे ब्रँड... आयपीएल 2025 दरम्यान मुंबई क्रिकेटची मोठी घोषणा! हिटमॅन म्हणाला...

Kagiso Rabada IPL 2025 : आशिष नेहरा लाडका 15 दिवसांपासून गायब, गेला तरी कुठे अन् IPL 2025 मध्ये कधी परतणार?