Kagiso Rabada IPL 2025 : आशिष नेहरा लाडका 15 दिवसांपासून गायब, गेला तरी कुठे अन् IPL 2025 मध्ये कधी परतणार?
गुजरात टायटन्स संघ 2025 च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी करत आहे.

Gujarat Titans IPL 2025
1/9
गुजरात टायटन्स संघ 2025 च्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी करत आहे.
2/9
कोच आशिष नेहरा यांचा लाडका आणि संघाचा स्टार वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाच्या पुनरागमनाची वाट पाहत आहे.
3/9
अनुभवी वेगवान गोलंदाज रबाडा 15 दिवसांपूर्वी 3 एप्रिल रोजी वैयक्तिक कारणांमुळे आपल्या घरी परतला होता.
4/9
दक्षिण आफ्रिकेचा हा वेगवान गोलंदाज या हंगामात फक्त दोन सामने खेळू शकला.
5/9
त्याने पंजाब किंग्जविरुद्ध 41 धावांत 1 विकेट घेतला, तर मुंबई इंडियन्सविरुद्ध 42 धावांत 1 विकेट मिळाला.
6/9
त्याची कामगिरी फारशी चमकदार नसली तरी, त्याचा अनुभव संघाच्या गोलंदाजीला बळकटी देत होता.
7/9
गुजरात टायटन्सचे सहाय्यक प्रशिक्षक आशिष कपूर म्हणाला की, "आम्ही त्याच्या येण्याची वाट पाहत आहोत, कदाचित तो परत येईल.
8/9
'त्याच्या कुटुंबात काही समस्या आहे ज्यासाठी तो गेला होता. पण तो कधी परत येईल हे आम्हाला माहित नाही, पण आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत.'
9/9
आशिष कपूर म्हणाला की, त्याच्या जागी अद्याप कोणत्याही खेळाडूची घोषणा केलेली नाही कारण संघाला विश्वास आहे की तो लवकरच परतेल.
Published at : 18 Apr 2025 09:49 PM (IST)