Shubman Gill Bhuvneshwar Kumar Gujarat Titans vs Sunrisers Hyderabad IPL 2022 : गुजरात टाइटन्स आणि सनराइजर्स हैदराबाद यांच्यामध्ये आज आयपीएलचा 40 वा सामना होणार आहे. दोन्ही संघांनी आधीच्या सामन्यात विजय मिळवला आहे. दोन्ही संघ विजयी लय कायम राखण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. हा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे. गुजरातकडून सलामीला उतरणाऱ्या शुभमन गिलसाठी भुवनेश्वर कुमार चिंता वाढवू शकतो. भुवनेश्वर कुमारविरोधात शुभमन गिलचा रेकॉर्ड खराब आहे. गिलला भुवनेश्वर कुमार विरोधात धावा काढण्यात अपयश आलेय. 


 गुजरातचा युवा फलंदाज शुभमन गिल याने यंदाच्या हंगमात सात सामने खेळले आहेत. या सात सामन्यात गिलने दोन अर्धशतकासह 207 धावा चोपल्या आहेत. यादरम्यान गिलची सर्वोत्तम धावसंख्या 96 आहे. पण भुवनेश्वर कुमारची गोलंदाजी खेळणं गिलला नेहमीच जड गेलेय. गिलने आतापर्यंत भुवनेश्वर कुमारच्या 37 चेंडूचा सामना केलाय. यामध्ये फक्त गिलला 32 धावाच काढता आल्या आहेत. तर भुवनेश्वर कुमारने दोन वेळा गिलला तंबूचा रस्ता दाखवलाय. भुवनेश्वर कुमारविरोधात गिलचा स्ट्राईक रेटही फक्त 86.48 इतका राहिलाय. आज होणाऱ्या सामन्यात गिल आणि भुवनेश्वर कुमार ही लढत पाहण्यासारखी असणार आहे. 


आयपीएलच्या 15 व्या हंगामात भुवनेश्वर कुमार याने भेदक मारा केलाय. भुवनेश्वर कुमारने सात सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. भुवनेश्वर कुमारने यंदाची सर्वोत्कृष्ट कामगिरी 22 धावा देत तीन विकेट घेत केली आहे. भुवनेश्वर कुमार याने आपल्या गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. भुवनेश्वर कुमारने आयपीएलमध्ये 139 सामन्यात 151 विकेट घेतल्या आहेत. तर दोन वेळा चार विकेट घेण्याचा आणि एकदा पाच विकेट घेण्याचा कारनामा केलाय.  


दरम्यान, गुणतालिकेचा विचार करता गुजरातने 7 पैकी 6 सामने जिंकत 12 गुणांसह दुसरं स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे हैदराबाद संघ देखील चांगल्या फॉर्ममध्ये असून त्यांनी 7 पैकी 5 सामने जिंकत 10 गुण खिशात घेऊन तिसरं स्थान मिळवलं आहे.