Suyash Prabhudessai Profile : आयपीएलमध्ये (IPL 2022) मंगळवारी रॉयल चँलेजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपरकिंग्स (RCB vs CSK) हे दोन संघ आमने-सामने आले होते. यावेळी बंगळरुचा संघ 23 धावांनी पराभूत झाला. पण संघातील एका खेळाडूने मात्र सर्वांचेच लक्ष वेधले. हा खेळाडू म्हणजे RCB संघातून पदार्पण करणारा सुयश प्रभुदेसाई (Suyash Prabhudessai). सामन्यात 217 धावांच्या बलाढ्य लक्ष्याचा पाठलाग करताना केवळ 50 धावांवर आरसीबीने त्यांचे चार गडी गमावले. ज्यानंतर सुयश प्रभुदेसाईने शाहबाज अहमदसोबत मिळून 33 चेंडूत 60 धावांची भागिदारी रचली. सलामीच्या सामन्यात 18 चेंडूत 34 धावांची खेळी करणाऱ्या सुयशने एक अप्रतिम रनआऊट देखील नावे केला. त्याच्या या खेळीमुळे सर्वांचे लक्ष त्याच्याकडे आले असून त्याचा आयपीएल प्रवासाची एक झलक पाहूया... 


सुयश प्रभुदेसाई हा 24 वर्षीय क्रिकेटपटू गोवा संघाकडून स्थानिक क्रिकेट खेळतो. त्याच्याकडे स्थानिक क्रिकेटचा चांगला अनुभव असून त्याने 19 प्रथम श्रेणी सामन्यांसह, 34 लिस्ट-ए सामने आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत. प्रथम श्रेणी सामन्यात सुयशने 42.88 च्या सरासरीने 1 हजार 158 रन केले आहेत. तर लिस्ट-ए क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 787 रन आहेत. स्थानिक टी-20 सामन्यात सुयशचा रेकॉर्ड दमदार आहे. त्याने 23 टी-20 सामन्यात 31.80 च्या सरासरीने आणि 150.47 च्या स्ट्राईक रेटने 477 रन केले आहेत. त्याच्या टी-20 मधील विस्फोटक स्ट्राईक रेटमुळेच त्याला IPL मध्ये संधी मिळाली आहे. सुयशला यंदाच्या महालिलावात आरसीबीने त्याच्या बेस प्राईज 30 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं आहे.


गोलंदाजी करण्याचीही क्षमता


विशेष म्हणजे सुयश हा विस्फोटक फलंदाजीसह गोलंदाजी देखील करु शकतो. सुयश मीडियम पेसर गोलंदाजी देखील करु शकतो. त्याने स्थानिक क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये 14 विकेट्स देखील घेतल्या आहेत. फील्डिंगमध्ये देखील सुयश अगदी तरबेज असून याचाच प्रत्यय त्याच्या आयपीएलच्या सलामीच्या सामन्यात आला. सुयशने चेन्नईविरुद्ध सहाव्या ओव्हरमध्ये CSK च्या मोईन अलीला शानदार पद्धतीने रनआऊट केलं. मॅक्सवेलच्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर सुयशने हा रनआऊट केला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :