चेन्नई : आयपीएल (IPL 2024) च्या 17 व्या हंगामातील सातवी मॅच चेन्नई सुपर किंग्ज (Chennai SUper Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यात पार पडली. चेन्नईनं या मॅचमध्ये 63 धावांनी विजय मिळवत गुजरात टायटन्सचा पराभव केला. आयपीएलमधील दुसऱ्या विजयासह चेन्नई सुपर किंग्ज आता गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. या मॅचमध्ये अनेक अविस्मरणीय क्षण पाहायला मिळाले. चेन्नईचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी यानं एक अफलातून कॅच घेतला. तर, मराठमोळा क्रिकेटर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यानं देखील धावत येत हनुमान उडी मारत गुजरात टायटन्सचा धोकादायक खेळाडू डेविड मिलरचा कॅच घेतला आणि मॅच चेन्नईच्या बाजूनं फिरवली. 


चेन्नईमधील एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर आयपीएलची सातवी मॅच पार पडली. या मॅचमध्ये गुजरात टायटन्सच्या संघाला गेल्या आयपीएलच्या फायनलमधील पराभवाचा वचपा काढण्याची संधी होती मात्र त्यांनी ती गमावली. गुजरात टायटन्सनं पहिल्यांदा बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 6 विकेटवर 206 धावा केल्या होत्या. यामध्ये शिवम दुबेनं 23 बॉलमध्ये 51 धावांची वादळी खेळी केली. ऋतुराज गायकवाड आणि राचीन रवींद्र यांनी चेन्नईला आक्रमक सुरुवात करुन दिली होती.


207 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या गुजरात टायटन्सची सुरुवात चांगली झाली नव्हती. गुजरातला पहिला धक्का कॅप्टन शुभमन गिल याच्या विकेटनं बसला, तो केवळ 8 धावा करु शकला. यानंतर चेन्नईला सहा, विजय शिंकर यांच्या रुपात आणखी दोन धक्के बसले. 






अजिंक्य रहाणेनं घेतला अफलातून कॅच


तुषार देशपांडे डावाच्या 12 व्या ओव्हरमध्ये बॉलिंग करत होता. यावेळी स्ट्राइकवर डेविड मिलर होता.  डेविड मिलरनं 15 बॉलमध्ये 21 धावांची वादळी खेळी केली होती. ऋतुराज गायकवाडचा बॉलिंग देण्याचा निर्णय तुषार गायकवाडनं सार्थ ठरवला. तुषार गायकवाडनं डेव्हिड मिलरला मोठे फटके मारण्याची संधी दिली नाही. तुषार गायकवाडनं डेव्हिड मिलरला ग्राऊंडच्या लांब बाऊंड्री असणाऱ्या भागात शॉट मारण्यास प्रवृत्त केलं. डेव्हिड मिलरनं मिड विकेट बाऊंड्रीच्या दिशेनं मोठा शॉट मारला. अजिंक्य रहाणे यावेळी अलर्ट होता. त्यानं धावत येत पुढच्या बाजूला उडी मारत कॅच घेतला आणि धोकादायक ठरणाऱ्या मिलरला माघारी जावं लागलं. 


चेन्नई आयपीएल गुणतालिकेत टॉपवर


चेन्नई सुपर किंग्जनं गुजरात टायटन्सला पराभूत करत दुसरा विजय मिळवला. या दुसऱ्या विजयासह सध्या चेन्नईचा संघ 4 गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. चेन्नईचं नेतृत्त्व करणाऱ्या ऋतुराजच्या नावावर आता दुसरा विजय नोंदवला गेला आहे. चेन्नईनं फलंदाज आणि गोलदांजांची चांगली कामगिरी या जोरावर गुजरातचा पराभव केला. 


संबंधित बातम्या : 


CSK vs GT, IPL 2024 : ऋतुराजसमोर गिल फेल, चेन्नईचा गुजरातवर 63 धावांनी विराट विजय


Vintage Dhoni : असा झेल होणे नाही, धोनीनं हवेत सूर मारत घेतला अविश्वसनीय झेल!