IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) पहिल्या हंगामापासून युवा खेळाडूंसाठी टीम इंडियाचं (Team India) प्रवेशद्वार राहिलं आहे. नवख्या खेळाडूंना आयपीएलमध्ये चमकदार कामगिरीमुळे ओळख मिळते. आयपीएलमध्ये (Indian Premier League) दमदार कामगिरी करून बुमराह, पांड्यासह अनेक खेळाडूंनी भारतीय संघापर्यंतचा प्रवास केला आहे. यंदाचा आयपीएलला हंगामात अनेक क्रिकेटपटूंसाठी भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधी ही ठरत आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे अजिंक्य रहाणे.


Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणे


कसोटी संघातून वगळण्यात आल्यानंतर 34 वर्षीय अजिंक्य रहाणेची (Ajinkya Rahane) आयपीएल 2023 मध्ये स्फोटक फलंदाजी पाहायला मिळत आहे. या कामगिरीच्या जोरावर रहाणेनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) अंतिम सामन्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवलं आहे. यंदाच्या हंगामात अजिंक्य रहाणे नव्या रुपानं समोर आला आहे. यंदाच्या आयपीएलमधील पॉवर प्लेमध्ये त्याने 200 च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत. यामुळे आता 15 महिन्यांनंतर त्याचं भारतीय कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. 


Mohit Sharma : मोहित शर्मा


भारतासाठी विश्वचषक खेळणाऱ्या मोहित शर्माने (Mohit Sharma) गोलंदाजाने गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाकडून आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये पुनरागमन केलं. तब्बल तीन वर्षानंतर मोहित शर्मा आयपीएल टी20 लीगमध्ये परतला आहे. हा प्रवास मोहित शर्मासाठी सोपा नव्हता. गेल्या मोसमात म्हणजेच आयपीएल 2022 मध्ये मोहित गुजरात संघाचा नेट गोलंदाज होता आणि यंदा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात त्याला आयपीएल 2023 मध्ये पदार्पणाची संधी मिळाली. 34 वर्षीय मोहित खराब फॉर्म आणि नंतर दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहे. पण आयपीएलमध्ये मोहितनं मिळालेल्या संधीचा पुरेपुर फायदा घेत चमकदार कामगिरी केली आहे. आयपीएल 2023 मध्ये मोहित शर्माचा इकोनॉमी रेट 5 आहे.


Piyush Chawla : पीयूष चावला


आयपीएल 2021 मध्ये फक्त एकच सामना खेळलेला पीयुष चावला आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. आयपीएल 2022 च्या लिलावात चावला अनसोल्ड राहिला होता. यंदाच्या मोसमात मात्र पीयुष दमदार फलंदाजी करताना दिसत आहे. पीयुष चावलाने आयपीएल 2023 आतापर्यंत खेळलेल्या एकूण 6 सामन्यात 9 विकेट घेतल्या आहेत. या दरम्यान त्याचा इकोनॉमी रेटही फक्त 6.87 इतका आहे.


Amit Mishra : अमित मिश्रा


आयपीएल 2022 मध्ये अमित मिश्राला कोणत्याही संघाने खरेदी केलं नव्हतं. आयपीएल 2023 मधील लखनौ सुपर जायंट्सचा स्टार फिरकीपटू 40 वर्षीय अमित मिश्रा आयपीएल 2022 मेगा लिलावात अनसोल्ड राहिला होता. त्यामुळे त्याचं करिअर संपलं असं मानलं जातं होतं. पण आयपीएल 2023 मिनी लिलावात त्याला लखनौ सुपर जायंट्स संघाने 50 लाखांच्या मूळ किमतीला खरेदी केलं. अमितने 2016 मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता.


Sandeep Sharma : संदीप शर्मा 


राजस्थान रॉयल्स संघाचा स्टार वेगवान गोलंदाज प्रमुख कृष्ण दुखापतीमुळे आयपीएल 2023 मधून बाहेर पडला आहे. यानंतर राजस्थान संघाने संदीप शर्माला आपल्या संघात सामील केलं. आयपीएल 2023 मिनी लिलावात संदीपला कोणत्याही संघाने विकत घेतलं नव्हतं. आयपीएल 2023 मध्ये पॉवरप्ले आणि डेथ ओव्हर्समध्ये त्याने शानदार गोलंदाजी केली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 : पराभवानंतर खेळाडूंवर भडकला कर्णधार विराट कोहली, 'आम्हाला यश मिळणं अपेक्षितच नव्हतं, कारण...'