MS Dhoni CSK Vs DC: चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात 31 मार्च रोजी सामना झाला. या सामन्यात दिल्लीने चेन्नईचा पराभव केला. दिल्लीने प्रथम खेळताना 191 धावा केल्या होत्या, पण चेन्नईला 20 षटकांत केवळ 171 धावा करता आल्या आणि 20 धावांनी सामना गमवावा लागला.
चेन्नईचा पराभव जरी झाला असला तरी मात्र चाहते एमएस धोनीची (MS Dhoni) खेळी पाहून खूप आनंदी आहेत. धोनीने फलंदाजीसाठी येताच पहिल्या चेंडूवर चौकार मारून संघाच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. धोनीने 16 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 37 धावांची नाबाद खेळी केली. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
धोनीच्या दिल्लीविरुद्धच्या आक्रमक खेळीची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. याचदरम्यान धोनीची धडाकेबाज फलंदाजी पाहिल्यानंतर पत्नी साक्षीने सोशल मीडियाच्या माध्यमातून मजेशीर प्रतिक्रिया दिली. दिल्ली आणि चेन्नईच्या सामन्यानंतर साक्षीने एक इंस्टाग्राम स्टोरी शेअर केली आहे.'स्ट्रायकर ऑफ द मॅच' पुरस्कार घेताना धोनीचा फोटो शेअर करत साक्षी म्हणाली की, सामन्यात आमचा पराभव झाला असं वाटलं नाही. तसेच साक्षीने ऋषभ पंतलाही टॅग करत "Welcome Back Rishbh Pant" असं म्हटलं आहे. साक्षीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
दिल्लीविरुद्धच्या पराभवामुळे चेन्नईचं मोठं नुकसान
आजचा सामना गमावल्यानंतर चेन्नई सुपर किंग्सची गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. तर कोलकाता नाईट रायडर्सने पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. चेन्नई आणि केकेआरचे 4 गुण आहेत. मात्र नेट रनरेट्या जोरावर केकेआरने गुणतालिकेत मुसंडी मारली आहे. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या हंगामातील पहिला विजय नोंदवला आणि 2 महत्त्वाचे गुण जमा केले. दिल्ली आता नवव्या स्थानावरून सातव्या स्थानावर पोहोचली आहे.
आज मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स-
आयपीएल 2024 च्या हंगामात आज मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सामना होणार आहे. मुंबईतील वानखेडे मैदानावर हा रंगतदार सामना होईल. भारतीय वेळेनूसार सायंकाळी 7.30 वाजता मुंबई आणि राजस्थानचा सामना सुरु होईल.
संबंधित बातम्या:
आंद्रे रसेलची पत्नी आहे सुपरमॉडेल; सोशल मीडियावर नेहमी असते चर्चेत, पाहा Photos