IPL: आयपीएल सामन्यांच्या प्रसारण हक्कांसाठी लिलावप्रक्रिया (IPL Media Rights Auction 2022) नुकतीच पार पडली असून यातून भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयने (BCCI) तब्बल 48 हजार कोटी 390 रुपये मिळवले आहेत. यावेळी बीसीसीआयनं चार गटांमध्ये मीडिया हक्क विकण्याचा निर्णय घेतला होता. पहिला गट भारतातील टीव्ही मीडिया अधिकारांचा होता आणि यासाठी 23,575 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. दुसरा गट ओटीटी प्लॅटफॉर्मवर टेलिकास्ट अधिकारांचा होता आणि त्यासाठी 20,500 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. तिसरा गट विशेष श्रेणीतील सामन्यासाठी होता, ज्यासाठी 3,258 कोटी रुपयांची बोली लावली गेला. तर, चौथा गट विदेशी प्रसारण हक्कांसाठी होता ज्यासाठी 1,057 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली. 


मीडिया हक्कांच्या लिलावाद्वारे बीसीसीआयला 48390 कोटींची कमाई झाली. टीव्ही आणि डिजिटलचे अधिकार वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात आले आहेत. स्टार स्पोर्ट्सनं आयपीएलचा टीव्ही जिंकला आहे आणि व्हायकॉम18 ग्रुपने डिजिटल अधिकार जिंकले आहेत. दुसरीकडे,  व्हायकॉम18 स्पेशल कॅटेगरी राइट्स आणि व्हायकॉम18 आणि टाईम्स इंटरनेटनं परदेशी मीडिया अधिकार विकत घेतले आहेत.


कुठे पाहता येणार सामने?
पूर्वीप्रमाणेच आयपीएलचे सामने भारतातील स्टार स्पोर्ट्सवर पाहता येतील. आयपीएल 2023 ते 2027 पर्यंत स्टार स्पोर्ट्स टीव्हीवर आयपीएल सामने प्रसारित करेल.  आयपीएल सामन्यांच्या डिजिटल प्रक्षेपणाचे हक्क व्हायकॉम ग्रुपकडं आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही व्हायकॉम 18 च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आयपीएल 2023-2027 चे सर्व सामने पाहू शकाल.  व्हायकॉम18 कडं सध्या वूट अॅप आहे.  महत्वाचं म्हणजे, आयपीएल सामने प्रसारित करण्यासाठी व्हायकॉम 18 नवी अॅप लॉन्च करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. 


हे देखील वाचा-